Millets Products Business : ज्वारी, मका, बाजरीच्या उत्पादनांतून, ‘ही’ महिला करतीये लाखोंची कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह देशभरातील अनेक भागात सध्या शेती आधारित प्रक्रिया उद्योगांमध्ये (Millets Products Business) ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने उतरत आहे. विशेष म्हणजे सुशिक्षित तरुण आणि शेतीची पार्श्वभूमी असल्यांची संख्या यात अधिक आहे. ग्रामीण भागात प्रक्रिया उद्योग उभे राहत असल्याने शेतकऱ्यांना देखील त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळण्यास मोठी मदत होत आहे. अशातच महिला देखील यामध्ये मागे नसल्याचे पाहायला मिळत आहे. ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ यापासून चिप्स, कुकीज आणि अनेक उत्पादने (Millets Products Business) तयार करत, एका महिलेने कंपनी स्थापन करत आपली आर्थिक प्रगती साधली आहे. त्या आपल्या कंपनीच्या माध्यमातून वार्षिक 20 ते 30 लाखांची कमाई करत आहे.

स्वतःचे ब्रॅण्ड्स विकसित (Millets Products Business Success Story)

संगीता सिंह असे या महिलेचे नाव असून, त्या उत्तर प्रदेशातील कानपुर येथील रहिवासी आहेत. त्यांनी भरडधान्य (ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ) यापासून चिप्स, कुकीज आणि अनेक उत्पादने तयार करून, स्वतःचे ब्रॅण्ड्स विकसित (Millets Products Business) केले आहे. यामध्ये प्रामुख्याने त्या गाजर, बीट, पालक यांचा देखील वापर करतात. सुरुवातीच्या काळात त्यांना प्रक्रिया उद्योगात उतरण्यासाठी प्लांटसाठी एकूण 25 लाखांचा खर्च आला. ज्यासाठी त्यांनी दोन वर्षांपुर्वी प्रधानमंत्री रोजगार सृजन कार्यक्रम योजनेअंतर्गत 10 लाख रुपये इतके कर्ज उभारले होते. याशिवाय काही घरगुती भांडवल लावून त्यांनी व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली होती. मात्र, आता त्यांचा व्यवसाय देशविदेशात विस्तारला असून, त्या आपल्या कंपनीच्या माध्यमातून वार्षिक 20 ते 30 लाखांचा टर्नओव्हर करत आहे.

उत्पादनांना देश-विदेशात मागणी

संगीता सिंह सांगतात, भरडधान्यापासून प्रामुख्याने ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ, मका यापासून बनवत असलेल्या त्यांच्या सर्वच उत्पादनांना देशातील सर्वच राज्यांमध्ये मोठी मागणी आहे. याशिवाय आपली सर्व उत्पादने अमेझॉन, फ्लिपकार्टसह सर्वच ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. ज्यामुळे आपल्याला देशभरात उत्पादने पोहचवण्यासाठी मोठी मदत झाल्याचे त्या सांगतात. याशिवाय जपान, दुबई, तुर्की आणि फ्रांस या देशांमधून देखील आपल्या उत्पादनांना मोठी मागणी वाढते आहे. ज्यासाठी आपली विदेश स्तरावर बोलणी सुरु आहे. सध्याच्या घडीला आपल्याला वार्षिक 20-30 लाख रुपये उत्पन्न मिळत असल्याचे त्या सांगतात.

महिलांना करतायेत प्रोत्साहित

संगीता सिंह सांगतात, पंतप्रधान मोदी कानपुर दौऱ्यावर आले असताना त्यांची आणि आपली भेट झाली होती. त्यावेळी आपण भरडधान्य आधारित उद्योगावर काम करत असल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांनी आपल्या कामाची मोठी प्रशंसा केली होती. त्यामुळे सध्या आपण कानपूरच्या ग्रामीण भागातील महिलांना प्रक्रिया उद्योगामध्ये उतरण्यासाठी प्रोत्साहीत करत असल्याचे त्या सांगतात. दरम्यान, कृषी प्रक्रिया उद्योगामध्ये केवळ दोन वर्षांमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेल्या संगीता सिंह यांना अनेक पुरस्कार मिळाले असल्याचे त्या सांगतात.

error: Content is protected !!