तुर्कीच्या बाजरीतून लाखोंचे उत्पन्न; बाजरीचं पीक पाहण्यासाठी धुळे जिल्ह्यातून गर्दी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात आणि राज्यात हल्ली अनेक तरुण हे शेती व्यवसायाकडे वळत आहेत. यातून लाखोंचे उत्पन्न मिळवत आहेत. अशातच अजून एक धुळे जिल्ह्यातील डॉ. अनिल जैन यांनी तुर्की बाजरीची पेरणी करून उत्पादन घेतले आहे. एका एकरात तुर्की बाजरीचे ३० क्विंटल उत्पादन घेतलं असून हे पीक पाहण्यासाठी आता धुळे जिल्ह्यातून गर्दी होताना दिसतेय.

खानदेशातील बोरस या गावतील शेतकरी अनिल जैन हे तुर्की ज्वारीच्या देशी वाणाचे उत्पादक आहेत. जानेवारीत लावलेल्या बाजरीच्या पिकाची काढणी ही आता करता येईल. एकूण दहा एकरात या पिकाचे उत्पादन घेऊन अनिल जाऊन यांनी चांगली कामगिरी केली आहे. ज्वारीची उंची ही १० फुटांपर्यंत असून कणसाची उंची ही ३ फुटांपर्यंत आहे. या बाजरीची विक्री ही एकरमध्ये ३० क्विंटलपेक्षा अधिक उत्पादन असून ४० हजार रुपये ज्वारीची विक्री होणार आहे.

सध्या एका एकरमध्ये बारा लाख रुपयांचे उत्पन्न मिळावे अशी अपेक्षा असून शेतकऱ्यांची धुळे जिल्ह्यातून तुर्की ज्वारीचे पीक पाहण्यासाठी गर्दी होताना दिसत आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांना आधुनिक शेतीतून विकसनशील शेती करावी असे स्वप्न असते. अशातच आता शेतकरी जैन यांनी आधुनिक शेती करून विकसनशील प्रयोग करावेत. असे आवाहन शेतकऱ्यांना केलं आहे. मात्र असे असले तरीही यंदा बाजरीच्या दरात घट पहायला मिळते.

अवकाळी पावसामुळे बाजरीचे नुकसान :

यंदा अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळं गहू, बाजरी, मका, सोयाबीन, कापूस या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अतिवृष्टीमुळं अनेक ठिकाणी बाजरी काळी पडली आहे, परिणामी त्याची विक्री होत नसल्यानं शेतकऱ्यांचे अर्थकारण बदललं आहे.

error: Content is protected !!