Mini Tractor : कॅप्टन कंपनीचा मोठया कामांसाठी छोटा ट्रॅक्टर; वाचा किंमत, वैशिष्ट्ये!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मध्यम आणि अल्प-भूधारक शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टरचे (Mini Tractor) नेहमीच शेतीमध्ये आकर्षण असते. जमीन कमी होत चालल्याने मोठ्या ट्रॅक्टरऐवजी मिनी ट्रॅक्टरचा वापर वाढला आहे. कमी किमतीत आणि कमी खर्चात शेतीची सर्व कामे होत असल्याने मिनी ट्रॅक्टर खरेदीकडे शेतकऱ्यांचा ओढा अधिक असतो. त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या शेतीसाठी मिनी ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कॅप्टन या ट्रॅक्टर उत्पादक कंपनीने देशातील लहान शेतकऱ्यांसाठी ‘कॅप्टन 280 4 डब्ल्यूडी’ या आकर्षक ट्रॅक्टरची निर्मिती केली आहे. त्यामुळे तुम्ही हा मिनी ट्रॅक्टर (Mini Tractor) खरेदी करून आपली शेती सुजलाम सुफलाम करू शकतात.

‘कॅप्टन 280 4 डब्ल्यूडी’ ट्रॅक्टरबद्दल (Mini Tractor For Farmers)

‘कॅप्टन 280 4 डब्ल्यूडी’ या ट्रॅक्टरला कंपनीने 1290 सीसी क्षमतेसह 2 सिलेंडर दिलेले आहेत. हा ट्रॅक्टर 28 HP चा असून, तो ड्राय टाइप एयर फिल्टरसह येतो. तसेच या ट्रॅक्टरला कंपनीने वॉटर कुलिंग सिस्टीम दिलेली आहे. कॅप्टन कंपनीचा हा ट्रॅक्टर जास्तीत जास्त 24 HP पीटीओ पावरसह येतो. तसेच हा ट्रॅक्टर 2500 आरपीएमची निर्मिती करतो. कंपनीने या ट्रॅक्टरला पुढील बाजूस 25 kmph इतका वेग दिलेला आहे. हा ट्रॅक्टर जवळपास 750 किलोग्रॅम वजन उचलण्याची क्षमता ठेवतो. त्याचे एकूण वजन 945 किलोग्रॅम इतके आहे. कंपनीचा हा ट्रॅक्टर ADDC,Cat- II 3 point Linkage सह येतो. कॅप्टन कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरची 2610 MM लांबी आणि 825 MM रूंदीसह 1550 MM व्हीलबेसमध्ये तयार केलेले आहे.

‘कॅप्टन 280 4 डब्ल्यूडी’ ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये

  • कॅप्टन 280 4 डब्ल्यूडी या ट्रॅक्टरला कंपनीने मेकॅनिकल तसेच पॉवर स्टीयरिंग दिलेली आहे.
  • या मिनी ट्रॅक्टरला कंपनीने पुढील बाजूस 8 आणि मागील बाजूस 2 गिअर दिलेले आहेत.
  • कॅप्टन कंपनीचा हा मिनी ट्रॅक्टर सिंगल क्लचसह उपलब्ध आहे. ज्यास सिंक्रोमेश टाइप ट्रांसमिशन देण्यात आले आहे.
  • हा मिनी ट्रॅक्टर Dry internal Exp. Shoe (Water Proof) ब्रेकसोबत येतो.
  • या ट्रॅक्टरला कंपनीने 19 लीटर क्षमतेची डिझेल टाकी दिलेली आहे.
  • हा ट्रॅक्टर Twin Speed PTO पावर टेकऑफ सह येतो. जो 540 आरपीएमची निर्मिती करतो.
  • कंपनीने या ट्रॅक्टरला पुढील बाजूस 6.00 x 12 आकाराचे आणि मागील बाजूस 8.3 x 20 आकाराचे टायर दिलेले आहे.

किती आहे किंमत?

कॅप्टन कंपनीने भारतीय शेतकऱ्यांची गरज ओळखून या मिनी ट्रॅक्टरची (Mini Tractor) निर्मिती केली असून, त्याची किंमत अगदी कमी ठेवण्यात आली आहे. कंपनीने या ट्रॅक्टरची शोरूम किंमत 4.82 लाख ते 5.00 लाख इतकी निर्धारित केली आहे. देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये या ट्रॅक्टरची ऑन रोड प्राईस वेगवेगळी राहू शकते. कंपनीने या ट्रॅक्टरला 700 तास पूर्ण किंवा मग 1 वर्ष. जे आधी पूर्ण होईल इतक्या मुदतीची वारंटी देखील दिलेली आहे.

error: Content is protected !!