Mini Tractor : मोटरसायकलच्या किमतीत येतो ‘हा’ छोटा ट्रॅक्टर; वाचा… फीचर्स?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात पारंपारिक पद्धतीने शेती करण्याऐवजी सध्या आधुनिक साधनांचा (Mini Tractor) वापर शेतीमध्ये वाढला आहे. या साधनांमध्ये ट्रॅक्टरचा वापर सर्वाधिक होत असल्याचे दिसून येते. सध्या मोटर सायकल सर्वांच्याच घरी पाहायला मिळते. त्यामुळे आता जर मोटर सायकलच्या किमतीमध्ये शेतीसाठी ट्रॅक्टर मिळत असेल तर आपल्यापैकी बरेच जण खरेदी करण्यासाठी उत्सुक असू शकतात. याच पार्श्वभूमीवर आज आपण डीके चॅम्पियन 115 डीआय वामन या छोट्या ट्रॅक्टरबद्दल (Mini Tractor) सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

काय आहे ‘या’ ट्रॅक्टरची विशेषतः? (Mini Tractor Dk Champion 115 Di Vaman Tractor)

डीके चॅम्पियन 115 डीआय वामन हा छोटा ट्रॅक्टर (Mini Tractor) ‘ग्रीव्हज’ या नामांकित ब्रँडने तयार केला आहे. या ट्रॅक्टरला 510 सीसीसह सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. डीआय व्हर्टिकल डिझेल, एअर कूल्डसह हे इंजिन पाहायला मिळते. जे 10 एचपी पॉवर जनरेट करते. याशिवाय कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला ऑइल बाथ टाइप एयर फिल्टर दिलेला आहे. जो ट्रॅक्टरचे धूळ माती यापासून संरक्षण करतो. या छोट्या ट्रॅक्टरचे इंजिन 3000 आरपीएमची निर्मिती करते. तसेच या छोट्या ट्रॅक्टरला 500 किलो वजन उचण्याची क्षमता देण्यात आली असून, त्याचे वजन 350 किलोग्रॅम इतके आहे. कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला 2150 एमएम लांबी आणि 885 एमएम रुंदीसह 1010 एमएम व्हीलबेसमध्ये तयार केले आहे.

काय आहेत फीचर्स?

डीके चॅम्पियन 115 डीआय वामन या छोट्या ट्रॅक्टरला (Mini Tractor) कंपनीने हॅण्डलबार टाइप स्टीयरिंग दिले आहे. जो ओबडधोबड रस्त्यांवरून चालवताना देखील चालकाला आरामदायक अनुभव प्रदान करते. कंपनीने आपल्या या छोट्या ट्रॅक्टरला पुढील बाजूस 6 आणि मागील बाजूस 3 रिव्हर्स गिअरसह गिअरबॉक्स दिलेला आहे. हा छोटा ट्रॅक्टर तुम्हाला ड्युअल प्लेट टाइप क्लचसह उपलब्ध आहे. जो फुल्ली कॉन्स्टन्ट मेश ट्रांसमिशनमध्ये दिला आहे.

तसेच या ट्रॅक्टरला मॅकेनिकल, इंटर्नल एक्सपान्डिग शो टाईप ब्रेक्स देण्यात आले आहे. जे टायर्सवर आपली मजबूत पकड निर्माण करतात. कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला पुढील बाजूस 2 ते 20 किमी प्रति तास तर मागील बाजूस 2 ते 10 किमी प्रतितास इतका वेग दिलेला आहे. डीके चॅम्पियन 115 डीआय वामन छोटा ट्रॅक्टर टू व्हील ड्राइवसह उपलब्ध आहे. कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला पुढील बाजूस 4.50 x 10 आकारात तर मागील बाजूस 6.00 x 12 आकारात टायर दिले आहे.

किती आहे किंमत?

डीके चॅम्पियन 115 डीआय वामन या छोट्या ट्रॅक्टरची शोरूम किंमत कंपनीने 2.47 लाख रुपये इतकी ठेवली आहे. जी मोटरसायकलच्या किमतीच्या बरोबरीने आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना या ट्रॅक्टरची खरेदी करणे सहज शक्य होणार आहे. आरटीओ रजिस्ट्रेशन आणि रोड टॅक्समुळे वेगवेगळ्या राज्यात या ट्रॅक्टरची किंमत वेगवेगळी पाहायला मिळू शकते.

error: Content is protected !!