Mini Tractor : शेतकऱ्यांसाठी खुशखबर, दुचाकीवर चालणारा ट्रॅक्टर झालाय लॉन्च!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या अनेक शेतकरी आपल्या शेतीमध्ये तंत्रज्ञानाची मदत घेत नवनवीन जुगाड (Mini Tractor) करताना दिसत आहेत. आणि विशेष म्हणजे स्वस्तात मस्त असणाऱ्या या जुगाडमुळे शेतकऱ्यांना शेती काम करणेही सोपे होत आहे. मात्र आता छत्रपती संभाजी नगर येथील Biketor Agro या कंपनीने शेतकऱ्यांची गरज ओळखून, अशाच एका मोटरसायकलवर चालणाऱ्या भन्नाट जुगाडू ट्रॅक्टर लॉन्च केला आहे. लहान शेतकऱ्यांचे शेतीतील कष्ट कमी व्हावे, या उद्देशाने या मिनी ट्रॅक्टरची (Mini Tractor) निर्मिती करण्यात आली आहे.

सध्या बैलांची संख्या कमी होत चालली आहे. त्यातच बैल आणि जनावरांच्या किमतीही कमी नाही. लहान शेतकऱ्यांना पेरणी आणि अन्य शेतीची कामे करताना मोठा ट्रॅक्टर (Mini Tractor) घेणेही परवडणारे नसते. त्यामुळे आता Biketor Agro या कंपनीचा ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय ठरणार आहे. तुम्ही कोणत्याही 150 सीसी मोटरसायकलचा वापर करून हा ट्रॅक्टर शेतात चालवू शकणार आहात. या ट्रॅक्टरला हार्वेस्टर, स्प्रेअर, पेरणी यंत्र, ट्रॉली आणि रोटाव्हेटर सारखी मुख्य यंत्रेही जोडता येऊ शकता. इतकेच नाही तर कधी वीज नसेल शेतात पिकांना पाणी देण्यासाठी देखील या ट्रॅक्टरचा उपयोग होऊ शकणार आहे.

कोणत्या कामासाठी उपयोग (Mini Tractor Motorcycle-Powered Tractor)

या ट्रॅक्टरला कंपनीने आशा बाईकटर असे नाव दिले असून, त्याच्या वापरासाठी शेतकऱ्यांना कोणतीही विशेष व्यवस्था करावी लागत नाही. हा ट्रॅक्टर शेतकरी आपली मोटरसायकल जोडून वापरू शकणार आहे. शेतकरी या मिनी ट्रॅक्टरचा वापर पेरणी, खते, सिंचन, फवारणी, खुरपणी, कापणी आणि वाहतुकीसाठी देखील करू शकणार आहे. पुण्यात अलीकडेच संपन्न झालेल्या शेतकरी मेळाव्यात आशा बाईकटर या ट्रॅक्टरचे प्रदर्शन करण्यात आले होते.

काय आहेत फीचर्स?

  • या ट्रॅक्टरच्या मदतीने शेतकरी 500 किलोपर्यंतचा भार उचलू शकतात.
  • जमिनीपासून 300 मिमी उंची असल्याने शेतकरी पिकांचे नुकसान न होता हा ट्रॅक्टर वापरू शकतात.
  • शेतातील कामांसाठी शेतकऱ्यांचा होणारा खर्च 60 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो.
  • शेतातील काम झाल्यानंतर तुम्ही तुमची मोटर सायकल पुन्हा कुठेही जाण्यासाठी वापरू शकतात. नव्याने काम करताना पुन्हा ट्रॅक्टरला जोडू शकतात.
  • या ट्रॅक्टरचा ताशी वेग हा 10 ते 15 किमी इतका आहे. हा ट्रॅक्टर केवळ 150cc ते 350cc क्षमता असलेल्या मोटरसायकलसह काम करू शकणार आहे.
  • ऊन, वारा, पाऊस यामुळे ट्रॅक्टर केबिनची व्यवस्था देण्यात आली आहे.

किती आहे किंमत?

Biketor Agro या कंपनीचा आशा बाईकटर हा मिनी ट्रॅक्टर सध्या राज्यातील पुणे, नाशिक,औरंगाबाद, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात हा ट्रॅक्टर उपलब्ध आहे. त्याची किंमत कंपनीने अडीच लाख रुपये इतकी ठेवली आहे. तीन वर्षांच्या अथक परिश्रमानंतर कंपनीने हा ट्रॅक्टर लॉन्च केला आहे. हा मिनी ट्रॅक्टर असून, याच्या वापरामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामे करणे आता सुलभ होणार आहे.

error: Content is protected !!