Mini Tractor : सॉलीस कंपनीचा छोटा ट्रॅक्टर, करतो दमदार कामे; वाचा किंमत, वैशिष्ट्ये!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात मोठ्या ट्रॅक्टरपेक्षा मिनी ट्रॅक्टरला (Mini Tractor) सध्या अधिक महत्व प्राप्त झाले आहे. परिणामी, जवळपास सर्वच ट्रॅक्टर उत्पादक कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या गरजेनुसार विविध एचपीचे मिनी ट्रॅक्टर तयार केले आहेत. आता, तुम्ही एखादा नावाला छोटा मात्र कठीण काम करणारा ट्रॅक्टर घेण्याच्या शोधात असाल. तर सॉलीस कंपनीचा ‘Solis 2516 SN’ हा दमदार ट्रॅक्टर तुमच्या शेतीतील कठीणातील कठीण कामे कमी इंधनात देखील करू शकतो. फळबाग शेतकऱ्यांसाठी तर हा एकदम उत्तम मिनी ट्रॅक्टर (Mini Tractor) गेला आहे. आज आपण सॉलीस कंपनीच्या या ‘सॉलीस 2516 एसएन’ अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

‘सॉलीस 2516 एसएन’बद्दल (Mini Tractor Solis Company)

‘सॉलीस 2516 एसएन’ हा ट्रॅक्टर 1318 सीसी क्षमतेसह 3 सिलेंडरमध्ये उपलब्ध आहे. त्यास वॉटर कुलिंग इंजिन देण्यात आले आहे. हा ट्रॅक्टर 27 एचपीचा असून, 81 एनएमपर्यंत टॉर्क जनरेट करतो. कंपनीने या मिनी ट्रॅक्टरला (Mini Tractor) ड्राय टाईप एअर फिल्टर दिलेला आहे. सॉलीस कंपनीचा हा ट्रॅक्टर 2700 आरपीएमची निर्मिती करतो. याची जास्तीत जास्त पीटीओ पॉवर ही 23 एचपी इतकी आहे. या ट्रॅक्टरला कंपनीने 600 किलोग्रॅम वजन उचलण्याची क्षमता दिलेली आहे. या ट्रॅक्टरचे एकूण वजन 910 किलो इतके आहे. सॉलीस कंपनीचा हा ट्रॅक्टर ADDC, Cat- 1 3 पॉइंट लिंकेजसह येतो. ज्यामुळे शेतातील कठीणातील कठीण काम करण्यासाठी कृषी अवजारे जोडण्यास मदत होते. सॉलिस कंपनीच्या या ट्रॅक्टरला कंपनीने 2705 MM लांबी आणि 1070 MM रुंदीसह 1565 MM व्हीलबेसमध्ये तयार केले आहे.

‘सॉलीस 2516 एसएन’ ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये

  • ‘सॉलीस 2516 एसएन’ मिनी ट्रॅक्टरला कंपनीने पॉवर स्टीयरिंग दिलेली आहे.
  • याशिवाय कंपनीने या ट्रॅक्टरला पुढील बाजूस 12 आणि मागील बाजूस 4 गिअर दिलेले आहेत.
  • या ट्रॅक्टरला कंपनीने सिंगल टाईप क्लच दिलेला आहे. तो पूर्णपणे सिंक्रोमेश टाईप ट्रांसमिशनमध्ये देण्यात आला आहे.
  • सॉलीस कंपनीने या ट्रॅक्टरला पुढील बाजूस 19.1 kmph स्पीड दिलेला आहे.
  • या ट्रॅक्टरला कंपनीने मल्टी डिस्क आउटबोर्ड ऑइल इमर्जड ब्रेक दिलेला आहे.
  • सॉलिस कंपनीचा हा ट्रॅक्टर रिझर्व्ह पीटीओ पॉवर टेकऑफसह येतो. जो 540/540 E आरपीएमची निर्मिती करतो.
  • सॉलीस 2516 एसएन’ हा मिनी ट्रॅक्टर 4WD ड्राइवसह उपलब्ध आहे.
  • या ट्रॅक्टरला कंपनीने पुढील बाजूस 6.00 x 12 /6 पीआर आणि मागील बाजूस 8.3 x 20/6 पीआर टायर दिले आहेत.

किती आहे किंमत?

सॉलिस कंपनीने या मिनी ट्रॅक्टरची किंमत शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन निर्धारित केले आहे. कंपनीने या ट्रॅक्टरची शोरूम किंमत 5.50 लाख ते 5.90 लाख रुपये इतकी निर्धारित केली आहे. या ट्रॅक्टरची किंमत वेगवेगळ्या राज्यांमध्ये आरटीओ रजिस्ट्रेशन आणि रोड टॅक्समध्ये वेगवेगळी राहू शकते. कंपनीने ‘सॉलीस 2516 एसएन’ या मिनी ट्रॅक्टरला 5 वर्षांची वारंटी दिलेली आहे.

error: Content is protected !!