Mini Tractor : ‘स्वराज टार्गेट 630’ ट्रॅक्टर, अल्प भूधारक शेतकऱ्यांची पहिली पसंत; वाचा किंमत…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील बहुतांश अल्प भूधारक शेतकऱ्यांकडे जमीन कमी असल्याने ते मोठे ट्रॅक्टर (Mini Tractor) खरेदी करू शकत नाहीत. अशा स्थितीत मिनी ट्रॅक्टरचा कल झपाट्याने वाढत आहे. मोठ्या ट्रॅक्टरच्या तुलनेत मिनी ट्रॅक्टरची किंमत किफायतशीर असल्याने, मिनी ट्रॅक्टर खरेदीकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढतो आहे. स्वराज कंपनीने ‘स्वराज टार्गेट 630’ हा आपला मिनी ट्रॅक्टर अशाच लहान शेतकऱ्यांसाठी बनवला आहे. फळबाग शेतकऱ्यासांठी तर हा उत्तम ट्रॅक्टर मानला गेला आहे. तुम्हीही मिनी ट्रॅक्टर (Mini Tractor) घेण्याचा विचारात असाल तर स्वराज कंपनीचा टार्गेट 630 हा ट्रॅक्टर तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतो.

फळबाग उत्पादकांसाठी सर्वोत्तम (Mini Tractor Swaraj Target 630)

देशातील सर्वच ट्रॅक्टर कंपन्यांनी मिनी ट्रॅक्टरची निर्मिती केली आहे. त्यामुळे भविष्याच्या दृष्टीने एकदाच वाहन खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर खरेदीचा निर्णय हा खूप महत्वाचा असतो. या पातळीवर स्वराज कंपनीच्या टार्गेट 630 हा ट्रॅक्टर अत्यंत विश्वासू ठरतो. हा ट्रॅक्टर 29 एचपी क्षमतेचा ट्रॅक्टर असून, याचा आकार खूपच लहान आहे. फळबागांसाठी आणि इतर पिकांच्या कामांकरिता तो खूप उपयोगी आहे.

‘स्वराज टार्गेट 630’ ची वैशिष्ट्ये

‘स्वराज टार्गेट 630’ हा अत्यंत मजबूत ट्रॅक्टर असून, त्याचा आकारामुळे तो विशेष प्रसिद्ध आहे. कठीण परिस्थितीमध्ये देखील तो उत्तम काम करते. या ट्रॅक्टरला 9 फॉरवर्ड आणि 3 रिव्हर्स गिअरसह गिअरबॉक्स देण्यात आलेला असून, तो ट्रॅक्टर कंट्रोलसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. तीन सिलेंडर असलेला स्वराजचा हा मिनी ट्रॅक्टर (Mini Tractor) अतिशय कार्यक्षम असल्यामुळे कमीत कमी किमतीत चांगला नफा देण्यासाठी तो सक्षम आहे. या ट्रॅक्टरला कंपनीने 2800 आरपीएमची इंजिन क्षमता दिली आहे. जे 29 एचपी पवार जनरेट करते. या ट्रॅक्टरला कंपनीने 24 एचपी इतकी पीटीओ पावर दिली असून, तो 980 किलो इतके वजन उचलू शकतो. त्यामुळे बागकामासोबत हा ट्रॅक्टर वाहतुकीसाठी देखील उत्तम मानला गेला आहे.

किंमत किती?

‘स्वराज टारगेट 630’ या ट्रॅक्टरची किंमत कंपनीने पाच लाख 35 हजार रुपये इतकी ठेवली आहे. ही शोरूम किंमत असून, वेगवेगळ्या ठिकाणी ऑन रोड प्राईस वेगवेगळी असू शकते. याशिवाय या ट्रॅक्टरला स्वराज कंपनीने सहा वर्षांची वॉरंटी दिली आहे. ज्यामुळे हा ट्रॅक्टर अल्प भूधारक शेतकऱ्यांचा अत्यंत विश्वासू ट्रॅक्टर म्हणून समोर आला आहे.

error: Content is protected !!