Mini Tractors : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर खरेदी करा ‘हा’ ट्रॅक्टर; शेतीमध्ये होईल भरभराट!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीमध्ये कितीही संकटे आली, मागील वर्षी उत्पन्न मिळाले (Mini Tractors) नाही. तरीही पुढील वर्षीच्या हंगामात शेतीसाठी आवश्यक असलेले खर्च हे करावेच लागतात. मग त्यामध्ये बियाणे असो किंवा शेतीच्या मशागतीसाठी लागणारा खर्च किंवा कृषी यंत्रासाठी लागणारा खर्च असो हा करणे अपरिहार्य असते. कृषी यंत्र शेतीसाठी आवश्यक झाले आहेत. त्यात ट्रॅक्टर हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण काही ट्रॅक्टरविषयी माहिती घेणार आहोत. जे फारच स्वस्त, फायदेशीर आणि दमदार आहेत. त्यामुळे आता तुम्हीही अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ट्रॅक्टर खरेदीचा (Mini Tractors) विचार करत असाल. तर हे तीनही ट्रॅक्टर तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरणार आहे.

‘हे’ आहेत तीन स्वस्त ट्रॅक्टर (Mini Tractors For Farmers)

मॅसी फर्ग्युसन 1030 डी महाशक्ती : मॅसी फर्ग्युसन 1030 डी महाशक्ती हा ट्रॅक्टर फळबाग शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी फारच उपयोगी आहे. फळ बागेतल्या कामासाठी ज्यांना ट्रॅक्टर घ्यायचा असेल. त्यांनी मॅसी फर्ग्युसन 1030 डी महाशक्ती हे ट्रॅक्टर खरेदी करावे. या ट्रॅक्टरचा उपयोग आंब्याची बाग, द्राक्षबाग, संत्री आणि पिकांमध्ये जसे की सोयाबीन, मक्का, कापूस, ऊस पिकासाठी उपयुक्त आहे. या ट्रॅक्‍टरची किंमत ४ लाख ५० हजार ते ४ लाख ८० हजार आहे. या ट्रॅक्टरमध्ये पावर( एचपी) ३० एचपी देण्यात आली आहे.

पॉवरट्रक 425 एन : पॉवरट्रक 425 एन या ट्रॅक्टरचा उपयोग केवळ शेतीसाठी होत नसून, अधिक उत्पन्नासाठी इतर कामांसाठी सुद्धा करता येतो. पॉवरट्रक 425 एन या ट्रॅक्टरला मल्टी टास्कर ट्रॅक्टर असे म्हटले जाते. ज्यांना एकदम आधुनिक ट्रॅक्टर घ्यायची इच्छा असते, अशांसाठी हे ट्रॅक्टर अतिशय महत्वाचे आणि उपयोगी आहे. या ट्रॅक्‍टरची किंमत साधारपणे ३ लाख ३० हजार रुपये असते. या ट्रॅक्टरला इंजिन एचपी- 25 एचपी, HP- 25 hp देण्यात आले आहे.

आयशर 242 : आयशर 242 हे ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी फारच उपयुक्त आहे. कमी बजेटमध्ये जर चांगले ट्रॅक्टर हवे असेल तर आयशर 242 चांगला ऑप्शन आहे. याच्यामध्ये ही चांगल्या प्रकारच्या सुविधा देण्यात आली आहे. या ट्रॅक्टरची किंमत- ३ लाख ८५ हजार ते ४ लाख असते.

error: Content is protected !!