Mini Tractors : कॅप्टन कंपनीचा ‘हा’ छोटा ट्रॅक्टर, शेतात फोडतो सिंहाची डरकाळी; वाचा किंमत?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांमध्ये लहान ट्रॅक्टरचे (Mini Tractors) नेहमीच आकर्षण असते. मात्र, तुम्ही कॅप्टन कंपनीचा “कॅप्टन 273 फोर डब्लूडी” हा ट्रॅक्टर पाहिल्यास, पहिल्या क्षणात तुम्ही या ट्रॅक्टरचे चाहते झाल्याशिवाय राहणार नाही. कारण कंपनीने या ट्रॅक्टर छोट्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत छोट्या रूपात सादर केलेले आहे. परंतु, हा ट्रॅक्टर दिसायला जरी छोटा दिसत असला, तरी तो सिंहासारखी डरकाळी फोडून काम करतो. असे कंपनीचे म्हणणे आहे. त्यामुळे आता तुम्हीही तुमच्या शेतीसाठी छोटा ट्रॅक्टर घेऊ इच्छित असाल तर कॅप्टन कंपनीचा “कॅप्टन 273 फोर डब्लूडी” हा छोटा ट्रॅक्टर (Mini Tractors) तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरणार आहे.

“कॅप्टन 273 फोर डब्लूडी”ट्रॅक्टरबद्दल (Mini Tractors For Farmers)

कॅप्टन ही ट्रॅक्टर निर्माता कंपनी गेल्या काही काळापासून भारतीय शेतकऱ्यांसाठी भरोसेमंद कंपनी (Mini Tractors) म्हणून समोर आलेली आहे. कंपनीकडून शेतकऱ्यांच्या गरजेनुसार विविध रेंजचे अत्याधुनिक ट्रॅक्टर विकसित केले जात आहे. कॅप्टन कंपनीचा “कॅप्टन 273 फोर डब्लूडी” हा छोटा ट्रॅक्टर देखील शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आला आहे. या ट्रॅक्टरला कंपनीने 1319 सीसी क्षमतेसह 3 सिलेंडरमध्ये वॉटर कुलिंग इंजिनसह तयार केले आहे. हा छोटा ट्रॅक्टर 25 एचपी पॉवरसह 76.3 एनएम टॉर्क जनरेट करतो. या ट्रॅक्टरला कमीत कमी 21.5 एचपी इतकी पीटीओ पॉवर देण्यात आली आहे. हा ट्रॅक्टर 2500 आरपीएमची निर्मिती करतो. कंपनीने या ट्रॅक्टरला 22.31 किमी प्रति तास इतका वेग दिलेला आहे. ज्यामुळे हा ट्रॅक्टर दिसायला जरी छोटया असला तरी तो वेगाने पटपट कामे करतो. हा छोटा ट्रॅक्टर 600 किलोग्रॅम इतके वजन उचलू शकतो. याचे एकूण वजन 1040 किलोग्रॅम इतके आहे. कंपनीने 2650 MM लांबी, 1200 MM रुंदी आणि 1550 MM व्हीलबेसमध्ये आपल्या या शक्तिशाली ट्रॅक्टरची निर्मिती केलेली आहे.

“कॅप्टन 273 फोर डब्लूडी”ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये

  • कॅप्टन 273 फोर डब्लूडी हा ट्रॅक्टर पॉवर असिस्टेड स्टीयरिंगसह येतो.
  • या ट्रॅक्टरला कंपनीने पुढील बाजूस 8 आणि मागील बाजूस 2 गिअर दिलेले आहे.
  • हा ट्रॅक्टर ड्युअल क्लचसह उपलब्ध असून, तो सिंक्रोमेश ट्रांसमिशनसह देण्यात आला आहे.
  • या ट्रॅक्टरला कंपनीने मल्टी डिस्क ऑइल इमर्जड ब्रेक दिलेला आहे. ज्यामुळे शेतामध्ये किंवा रस्ते वाहतुकीदरम्यान तो चालकाला सुरक्षितता प्रदान करतो.
  • कॅप्टन 273 फोर डब्लूडी हा ट्रॅक्टर 4 WD ड्राइव सह उपलब्ध आहे.
  • या ट्रॅक्टरला कंपनीने पुढील बाजूस 6.5/80-12 आणि मागील बाजूस 280/70R18 आकारात टायर देण्यात आलेले आहे.

किती आहे किंमत?

कॅप्टन कंपनीचा “कॅप्टन 273 फोर डब्लूडी” हा शक्तीशाली ट्रॅक्टर कंपनीने विशेषकरून लहान शेतकऱ्यांची बनवला आहे. तसेच या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन कंपनीने या ट्रॅक्टर शोरूम किंमत 4.60 लाख ते 4.85 लाख रुपये इतकी निर्धारित केलेली आहे. ज्यामध्ये आरटीओ रजिस्ट्रेशन आणि रोड टॅक्स धरून ती वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी असू शकते.

error: Content is protected !!