Mini Tractors : ‘हे’ आहे चार सर्वोत्तम मिनी ट्रॅक्टर; ज्यावर शेतकऱ्यांचा भरोसा, वाचा… किंमत!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना शेतीसाठी ट्रॅक्टरची (Mini Tractors) सर्वाधिक गरज पडते. आजकाल शेतकऱ्यांकडे बैलांचे प्रमाण कमी झाले असून, त्यांची जागा मिनी ट्रॅक्टरने घेतली आहे. पेरणीपासून ते पिकांच्या काढणीपर्यंत सर्व कामे ही ट्रॅक्टरच्या मदतीने होत आहेत. पीक काढणीची मशिनरी ट्रॅक्टरला जोडून, पिकांची मळणी देखील ट्रॅक्टरच्याच मदतीने होते. त्यामुळे सध्या अनेक शेतकऱ्यांचा ओढा ट्रॅक्टर खरेदीकडे ओढा वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण देशातील सर्वोत्तम ४ मिनी ट्रॅक्टर, (Mini Tractors) त्यांची वैशिष्टये आणि किमतींबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांची भारतीय शेतकऱ्यांमध्ये मोठी क्रेझ आहे.

1. महिंद्रा जिओ 245 (Mini Tractors On Which Farmers Trust)

महिंद्रा जिओ 245 DI हा महिंद्रा कंपनीचा छोट्या शेतकऱ्यासांठी तयार करण्यात आलेला एक सर्वोत्तम ट्रॅक्टर आहे. या ट्रॅक्टरची (Mini Tractors) निर्मिती करताना कंपनीने ऍडव्हान्सड फीचर्स आणि हाय टेक्नोलॉजीचा वापर केलेला आहे. ज्यामुळे हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत मजबूत ट्रॅक्टर आहे. या ट्रॅक्टरची विशेषतः म्हणजे तो अत्यंत माफक दरात उपलब्ध असून, शेतकरी त्याची सहजपणे खरेदी करू शकतात. या ट्रॅक्टरला 23 लिटरची डिझेल टाकी असते. या ट्रॅक्टरचे वजन उचलण्याची क्षमता 750 किलोग्रॅम इतकी आहे. कंपनीने या ट्रॅक्टर किंमत 5.15 लाख ते 5.30 लाख या दरम्यान ठेवली आहे.

2. कुबोटा नियोस्टार B2741S 4WD

कुबोटा नियोस्टार B2741S 4WD हा 27HP रेंजचा एक मिनी ट्रॅक्टर (Mini Tractors) असून, त्याला कंपनीने 3 सिलेंडर दिले आहेत. या ट्रॅक्टरला कंपनीने 1261 सीसी क्षमतेचे पावरफुल इंजिन दिलेले आहे. जे 2600 आरपीएमची निर्मिती करते. यामध्ये कूलिंगसाठी लिक्विड कूल्ड सिस्टम देण्यात आली आहे. हा ट्रॅक्टर ड्राई टाइप एयर फिल्टरसोबत येतो. या ट्रॅक्टरला कंपनीने समोरील बाजूला 2.00 ते 19.8 किमी प्रति तास इतकी गती दिलेली आहे. या ट्रॅक्टरची वजन उचलण्याची क्षमता 750 किलोग्रॅम इतकी आहे. कंपनीने या ट्रॅक्टरची किंमत 5.80 लाख ते 5.82 लाख इतकी ठेवली आहे.

3. स्वराज 724 एक्स एम ऑर्चर्ड ट्रॅक्टर

स्वराज 724 एक्सएम ऑर्चर्ड ट्रॅक्टर हा 25 एचपीचा एक बलवान ट्रॅक्टर असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. या ट्रॅक्टरला कंपनीने दोन सिलेंडर दिलेले असून, त्याला 1824 सीसी पावरफुल इंजिन देण्यात आले आहे. जे 1800 आरपीएम पावर जनरेट करते. या ट्रॅक्टरला कंपनीकडून कूलिंगसाठी वॉटर कूल्ड सिस्टम देण्यात आली आहे. हा ट्रॅक्टर ड्राय टाईप, डुअल एलिमेंटसह डस्ट आणि अनलोडर टाइप एयर फिल्टरसह येतो. या ट्रॅक्टरची पीटीओ क्षमता ही 21.1 एचपी आहे. या ट्रॅक्टरला कंपनीने 60 लिटरची डिझेल टाकी दिलेली आहे. हा ट्रॅक्टर 1000 किलोग्रॅमपर्यंत वजन उचलू शकतो. कंपनीने या ट्रॅक्टर किंमत 4.70 ते 5.05 लाख रुपये इतकी ठेवली आहे.

4. पॉवरट्रॅक 425N ट्रॅक्टर

पॉवरट्रॅक कंपनीचा ‘पॉवरट्रॅक 425N’ हा ट्रॅक्टर आकर्षक डिझाईनमध्ये तयार करण्यात आला आहे. या ट्रॅक्टरची विशेषतः म्हणजे तो शेतीमधील सर्व लहान मोठी कामे अत्यंत सहजरीत्या करतो. कंपनीने हा ट्रॅक्टर 25 एचपीसह 2 सिलेंडरमध्ये उपलब्ध केलेला आहे. या ट्रॅक्टरला कंपनीने 1560 सीसी इंजिन दिले असून, जे 2000 आरपीएमची निर्मिती करते. या ट्रॅक्टरला कंपनीने 50 लिटरची डिझेल टाकी दिलेली आहे. कंपनीने या ट्रॅक्टरची अत्यंत कमी ठेवली असून, तो शेतकऱ्यासांठी केवळ 3.50 लाख रुपये किमतीत उपलब्ध आहे. दरम्यान, वरती दिलेल्या चारही ट्रॅक्टरची किंमत ही शोरूम किंमत आहे. ज्यात ऑन रोड प्राईसनुसार वेगवेगळ्या ठिकाणी बदल होऊ शकतो.

error: Content is protected !!