Mini Tractors : शेतकऱ्यांसाठी इंडो फार्मचा छोटा ट्रॅक्टर; वाचा किंमत, वैशिष्ट्ये!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील ट्रॅक्टर निर्मिती उद्योगामध्ये (Mini Tractors ) अनेक कंपन्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे इंडो फार्म ट्रॅक्टर कंपनी होय. इंडो फार्म ट्रॅक्टर कंपनीचे सर्वच ट्रॅक्टर शक्तिशाली इंजिन आणि इंधन बचतीच्या वैशिष्ट्यासह येतात. ज्यामुळे शेतकऱ्यांना कमी इंधनात अधिक काम करणे शक्य होते. शेतकरी छोट्या ट्रॅक्टरच्या मदतीने सर्व शेतीची सर्व कामे, कमी वेळात आणि कमी खर्चात पूर्ण करू शकतात. त्यामुळे आता तुम्ही देखील एखादा छोटा ट्रॅक्टर (Mini Tractors) घेण्याचा विचार करत असाल तर इंडो फार्म कंपनीचा ‘1020 डीआय’ हा ट्रॅक्टर तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरणार आहे.

काय आहे ‘या’ ट्रॅक्टरची विशेषतः? (Mini Tractors Indo Farm Company)

इंडो फार्म कंपनीचा ‘1020 डीआय’ हा छोटा ट्रॅक्टर (Mini Tractors) 895 सीसी क्षमतेसह सिंगल सिलेंडरमध्ये उपलब्ध आहे. जो वॉटर कुलिंग सिस्टीमसह येतो. हा ट्रॅक्टर साधारणपणे 20 एचपी पॉवर जनरेट करतो. कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला ऑइल बाथ टाईप एयर फिल्टर दिला आहे. जो इंजिनचे धूळ माती यापासून संरक्षण करतो. कंपनीने आपल्या या छोट्या ट्रॅक्टरला कमीत कमीत पीटीओ पॉवर 12 एचपी इतकी दिली असून, या ट्रॅक्टरचे इंजिन 2300 आरपीएमची निर्मिती करते. कंपनीने आपल्या या छोट्या ट्रॅक्टरला 23 लीटर क्षमतेची डिझेल टाकी दिली आहे. हा ट्रॅक्टर 500 किलो इतके वजन उचलू शकतो. तर कंपनीने त्याला 800 किलो वजनात तयार केले आहे.

काय आहेत या ट्रॅक्टरचे फीचर्स?

इंडो फार्म कंपनीने ‘1020 डीआय’ या छोट्या ट्रॅक्टरला (Mini Tractors) मेकॅनिकल/रेसरकलेटिंग बॉल टाईप स्टीयरिंग दिले आहे. याशिवाय कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला पुढील बाजूस 6 आणि मागील बाजूस 2 रिव्हर्स गिअरसह तयार केले आहे. हा ट्रॅक्टर सिंगल क्लचसह उपलब्ध आहे. ज्यास स्लिडिंग मेश टाइप ट्रांसमिशन देण्यात आले आहे. कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला पुढील बाजूस 26 किमी प्रति तास तर मागील बाजूस 12.92 किमी प्रति तास वेग दिलेला आहे.

याशिवाय या ट्रॅक्टरला ऑइल इमर्जड मल्टिपल डिस्क ब्रेक्स देण्यात आले आहे. ज्यामुळे ट्रॅक्टरवर तात्काळ नियंत्रण मिळवण्यात यश मिळते. हा ट्रॅक्टर 6 स्प्लिन टाइप पावर टेकऑफसह उपलब्ध आहे. जो 540 ते 2100 आरपीएमची निर्मिती करतो. हा छोटा ट्रॅक्टर टू व्हील ड्राइवसह उपलब्ध आहे. तसेच या ट्रॅक्टरला पुढील बाजूस 5.20 x 14 आकारात तर मागील बाजूस 8.00 x 18 आकारात टायर देण्यात आले आहे.

किती आहे किंमत?

इंडो फार्म कंपनीने ‘1020 डीआय’ या छोट्या ट्रॅक्टरची शोरूम किंमत 4.30 लाख ते 4.50 लाख रुपये इतकी निर्धारित केली आहे. आरटीओ रजिस्ट्रेशन आणि रोड टॅक्समुळे या ट्रॅक्टरची किंमत वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी राहू शकते. कंपनीने आपल्या या छोट्या ट्रॅक्टरला 2 वर्षांची वॉरंटी दिली आहे.

error: Content is protected !!