Mini Tractors : नववर्षात ‘या’ ट्रॅक्टरचा असेल बोलबोला; देणार ‘बड्या’ ट्रॅक्टर्सला टक्कर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : 2023 हे वर्ष आता संपल्यात जमा असून, आगामी नववर्षामध्ये शेती क्षेत्रामध्ये मिनी ट्रॅक्टरचे (Mini Tractors) भविष्य उज्ज्वल असणार आहे. त्यामुळेच बाजारात सध्या एकही ट्रॅक्टर कंपनी अशी नाहीये, ज्या कंपनीने आपला मिनी ट्रॅक्टर बाजारात आणलेला नाहीये. Sonalika, Mahindra, Swaraj, Kubota, Massey असो की मग John Deere असो. या सर्वच कंपन्यांनी आपआपले मिनी ट्रॅक्टर (Mini Tractors) बाजारात आणले आहे. येत्या नववर्षात हे मिनी ट्रॅक्टर मोठ्या क्षमतेच्या ट्रॅक्टरला टक्कर देणार असल्याचे ट्रॅक्टर उद्योगातील जाणकारांकडून सांगितले जात आहे.

मिनी ट्रॅक्टरला सर्वाधिक मागणी (Mini Tractors Market In 2024)

सर्वप्रथम 1998 मध्ये भारतामध्ये मिनी ट्रॅक्टर दाखल झाला. ट्रॅक्टर उद्योगातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार, “भविष्यात 25HP पेक्षा कमी क्षमतेचे ट्रॅक्टर पूर्ण मार्केट काबीज करू शकतात. सध्या मिनी ट्रॅक्टरचे मार्केट शेअर 10 टक्के आहे. जे भविष्यात 25 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. तर 45HP पेक्षा कमी क्षमतेच्या ट्रॅक्टरच्या शेअरमध्ये जवळपास 65-70 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. जे सध्या 58 टक्के इतके आहे. अर्थात मिनी ट्रॅक्टरच्या ट्रेंडमध्ये सर्वाधिक वाढ होणार आहे. सध्या जे शेतकरी 30-40 HP वापरत असतील ते मोठ्या प्रमाणात मिनी ट्रॅक्टरच्या खरेदीकडे वळण्याची शक्यता आहे.”

शेती क्षेत्र विभागल्याने शेतकऱ्यांचा ओढा

यापूर्वी शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करत होते. शेतीचे क्षेत्रही मोठे असायचे. मात्र सध्या शेतीचे विभाजन होऊन, जमिनीचा आकार लहान होत आहे. पिकांमधील विविधतेमुळे आता अगदी छोट्या जागेतही शेती केली जात आहे. त्यामुळे मोठया ट्रॅक्टरचा वापर कमी होऊन, छोट्या ट्रॅक्टरचा वापरात वाढ होणार आहे. त्यामुळे मिनी ट्रॅक्टरचा आगामी 2024 वर्षात बोलबाला राहणार असल्याचे ट्रॅक्टर उद्योगातील जाणकारांकडून सांगितले जात आहे.

मिनी ट्रॅक्टरचे फीचर्स?

  • 18 ते 28HP दरम्यान असलेल्या ट्रॅक्टरची गणना मिनी ट्रॅक्टर म्हणून होते.
  • मिनी ट्रॅक्टरची साईज भलेही छोटी असेल. मात्र त्यांचा इंजिनमध्ये खूप दम असतो. मिनी ट्रॅक्टरमध्ये 1000 CC ते 1500 CC चे इंजिन असते.
  • मिनी ट्रॅक्टरमध्ये 1500 ते 2500 RPM पर्यंतची क्षमता असते. यामध्ये प्रामुख्याने 2 व्हील आणि 4 व्हील ड्राइव असे दोन्ही ऑप्शन मिळतात.
  • मिनी ट्रॅक्टरला 8 फॉरवर्ड आणि 4 रिवर्स गेयर असतात. याशिवाय ऑइल इमर्स्ड ब्रेक, ऑटोमेटिक ट्रांसमिशनही असणार आहे.
  • मिनी ट्रॅक्टरला शेतीसाठीचे सर्व इक्विपमेंट कल्टिव्हेटर, हैरो, रोटावेटर, प्लाउ, ट्रॉली आणि ट्रेलर जोडले जाऊ शकतात.
error: Content is protected !!