Mixed Farming : केळी पिकात घेतले टरबूजाचे आंतरपीक; एकरात मिळवले दोन लाखांचे उत्पन्न!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदा पाऊस कमी असल्याने अनेक भागात शेती पिकांना पाण्याची कमतरता (Mixed Farming) भासत आहे. अशा स्थितीत दुष्काळी परिस्थितीवर मात करत जळगाव जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील जयनगर परिसरातील शेतकऱ्याने उपलब्ध असलेल्या पाण्याचे योग्य नियोजन व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केळी पिकात आंतरपीक म्हणून टरबूज लागवडीतून (Mixed Farming) एकरी सुमारे सुमारे दोन लाखांचे उत्पन्न घेतले आहे.

पाण्याचे योग्य नियोजन (Mixed Farming Success Story)

विठोबा रामदास करंजे असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते शहादा तालुक्यातील जयनगर येथील रहिवासी आहेत. शहादा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असताना पाण्याचे योग्य नियोजन करून, विठोबा यांनी जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात तीन टप्प्यामध्ये केळी पिकात आंतरपीक म्हणून टरबुजाची लागवड केली. तीन टप्प्याच्या लागवडीतून अडीच-अडीच महिन्यात एकूण लागवडीपैकी दोन टप्प्यांमध्ये चांगले उत्पन्न मिळाले आहे. एकरी पावणे दोन ते दोन लाखांचे उत्पन्न त्यांना टरबूज पिकातून मिळाले आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

जयनगरसह परिसरात अनेक शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थिती असल्याने, पिकांना पाणी पुरविणे जिकिरीचे जात आहे. मात्र, विठोबा यांच्या कूपनलिकेला आणि विहिरीला चांगले पाणी आहे. त्यामुळे त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि पाण्याचे योग्य नियोजन करून केळी पिकामध्ये आंतरपीक (Mixed Farming) म्हणून टरबूज लागवड करून लाखो रुपयांचे उत्पादन घेतले आहेत. संकरित बियाण्याचा वापर करून केळी पिकात ठिबक सिंचनाच्या साहाय्याने आंतरपीक म्हणून लावलेल्या टरबुजासाठी रासायनिक खत व औषध फवारणीचे योग्य नियोजन केल्याने चांगले उत्पादन त्यांना मिळाले आहे.

किती मिळाले उत्पन्न?

केळी पिकात आंतरपीक म्हणून टरबुजाचे उत्पन्न घेण्याचे हे त्यांचे दुसरे वर्ष आहे. टरबुजाचे आंतरपीक घेतल्याने केळीवर कोणताच प्रतिकूल परिणाम होत नाही. वातावरणानुसार रासायनिक विद्राव्य खताचे तसेच औषध फवारणीचे योग्य नियोजन केल्यास अधिक उत्पन्न घेता येते. एकरी सरासरी टरबूज पिकाला ६० हजार रुपये भांडवल लागले असून, सरासरी १० ते १२ रुपये प्रती किलो दर मिळाला आहे. ज्यातून त्यांना एकरी पावणे दोन ते दोन लाखांचे उत्पन्न त्यांना टरबूज पिकातून मिळाले आहे. असे शेतकरी विठोबा रामदास करंजे यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!