Miyazaki Mango : जगातील सर्वात महाग आंबा!! 2 लाख रुपये किंमत; आकार अगदी डायनासोरच्या अंड्यांसारखा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । बिहारमधील नालंदा जिल्ह्यात सर्वात महागाड्या आंब्याच्या जातीची (Miyazaki Mango) बाग उभारण्यात आली आहे. विशेष म्हणजे या आब्यांची किंमत २ लाख रुपये असून त्याचा आकार अगदी डायनासोरच्या अंड्यांसारखा आहे. या बागेत शेतमालकाने आंबे चोरीला जाऊ नयेत यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा देखील बसवला आहे. तसेच बागेत एक राखणदार कुत्रा देखील ठेवण्यात आला आहे. त्यामुळे संपुर्ण राज्यात या बागेचे आणि बाग मालकाचे चांगलेच कौतुक करण्यात येत आहे.

याबाबत मुकेश कुमार आणि रामकुमार या दोन शेतकर्यांनी सांगितले आहे की, त्यांनी त्यांच्या या तीन एकराच्या बागेत मियाजाकी आंबा (Miyazaki Mango) लावला आहे. या आंब्यासोबत बागेत ब्लॅक स्टोन, सीड लेस प्रजातींची रोप देखील लावण्यात आली आहेत. ही रोपे २०२१ मध्ये ढकनिया गावातील शेतकरी सुरेंद्र सिंह यांनी जपानहून मागवली होती. सुरुवातीला या आंब्याच्या झाडाला २१ आंबे आले होते. ते विकून त्याचा त्यांना चांगलाच नफा मिळाला.

सुरेंद्र सिंह यांच्या वडिलांची इच्छा होती की, या बागेत अनेक वेगवेगळ्या जातीची झाडे दिसावीत. म्हणून त्यांनी इतर ब्लॅक स्टोन, सीड ही आंब्याच्या प्रजाती मागवून घेतल्या. या सर्व झाडांची रोपे त्यांनी तीन एकर जमिनीत लावली. इतकेच नव्हे तर त्यांनी आपल्या बागेत वेलची, साबुदाणा अशा सर्व मसाल्यांची शेती करण्यास सुरुवात केली. यातून त्यांना चांगला मोबदला मिळायला सुरुवात झाली.

एक आंबा १० हजार रुपयांना – (Miyazaki Mango)

भारतामध्ये मियाजाकी (Miyazaki Mango) या आंब्याला खूप मोठी किंमत आहे. मियाजाकीचा एक आंबा १० हजार रुपयांना विकला जातो. तर आंतरराष्ट्रीय बाजारात याला २ लाख रुपये किलो किंमत आहे. या बाजारात आंब्याला ताइयो-नो-टोमागो, एग्स ऑफ सनशाइन म्हणतात. मियाजाकी ही आंब्याची सर्वात महाग प्रजाती आहे. तसेच याची लागवड करणे देखील तितके सोपे नाही. सर्व काळजी घेऊनच हे आंबे झाडाला लागतात. या आंब्याचा रंग देखील सोनेरी किंवा लाल असा असतो. तर या आंब्याचा आकार हा डायनासोरच्या अंड्यांसारखा असतो. खास करुन या आंब्याचे जपानमध्ये उत्पादन करण्यात येते. त्यामुळे या आंब्याचे नाव जपानवरील एका मियाजाकी शहरावरुन ठेवण्यात आले आहे. आता याच आंब्याची लागवड भारतात करण्यात येत आहे. यासाठी त्यांची तितकीच काळजी देखील घेण्यात येते.

error: Content is protected !!