MJPJAY Health Scheme : महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या पात्रता अटीत मोठा बदल, पहा किती रुपयांपर्यंत मोफत उपचाराची मर्यादा?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

MJPJAY Health Scheme : सन २०१२ साली राज्यात सुरू करण्यात आलेली महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना गोरगरिबांसाठी वरदान ठरत आहे. आता ही योजना राज्यातील सर्व नागरिकांसाठी लागू करण्याचा निर्णय नुकताच सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे. (Mahatma Jyotiba Phule scheme eligibility)

५ लाख रुपयांपर्यंत मिळणार मोफत उपचार

या योजनेमध्ये रुग्णाच्या आजारांवर दीड लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करण्याची मर्यादा होती. आता ही मर्यादा ५ लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. मूत्रपिंड या आजारावरील शस्त्रक्रियेसाठी मोफत उपचाराची मर्यादा अडीच लाखावर रुपयांवरुन साडेचार लाख रुपये करण्यात आली आहे. या योजनेत राज्यातील शासकीय व बिगर शासकीय १००० रुग्णालयांचा सहभाग असणार आहे. तसेच उपचार करण्यात येणाऱ्या आजारांची संख्या ९९६ वरुन १३५६ इतकी करण्यात आली आहे.

योजनेचा लाभ कोणाला मिळणार?

  • गट अ- पिवळे, केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंब.
  • गट ब- शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंब ( शासकीय/ निमशासकीय कर्मचारी यासह) व कोणत्याही प्रकारची शिधापत्रिकाधारक नसलेले कुटुंब, यामध्ये राज्यातील शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचाही समावेश होईल.
  • गट क- गट ‘अ’ आणि गट ‘ब’ मध्ये समाविष्ट न होणारे पुढील घटक शासकीय/ शासनमान्य आश्रम शाळेतील विद्यार्थी. मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक, तसेच माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडील निकषानुसार पत्रकार व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील सदस्य, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणी जीवित महाराष्ट्र राज्याबाहेरील रहिवासी असलेले बांधकाम कामगार व त्यांचे कुटुंब.
  • गट ड- लाभार्थीच्या ‘अ’ ब ‘क’ या गटामध्ये समाविष्ट न होणारे महाराष्ट्र सीमा भागातील रस्ते अपघातात जखमी झालेले महाराष्ट्राबाहेरील व देशाबाहेरील रुग्ण.
error: Content is protected !!