Monsoon 2023 : महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन; ‘या’ भागात पावसाची एन्ट्री

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । राज्यातील बळीराजाला सुखावणारी बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून ज्या मान्सूनकडे शेतकरी डोळे लावून बसला होता त्या मान्सूनचे आगमन (Monsoon 2023) आज राज्यात झालं आहे. याबाबतची अधिकृत घोषणाही जाहीर करण्यात आली आहे. आह म्हणजेच ११ जूनला महाराष्ट्रात नैऋत्य मान्सूनचे आगमन झालं आहे. यापूर्वी ८ जून रोजीच मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता, त्यानंतर आज ११ जून म्हणजेच अवघ्या ३ दिवसांनी मान्सून मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे.

पुणे हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ के एस होसाळीकर यानी ट्विटच्या माध्यमातून महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्याची माहिती दिली आहे. नैऋत्य मान्सूनचे आज 11 जूनला महाराष्ट्रात आगमन झाले. दक्षिण कोकणातील काही भाग, दक्षिण मध्य महाराष्ट्राचा काही भाग, संपूर्ण गोवा, कर्नाटकचा‌ व तामीळनाडू व आंध्रप्रदेशचा‌ काही भाग व्यापला अशी माहिती त्यांनी दिली आहे.

शेतकरी मित्रांनो, तुम्हालाही रोजचा हवामान अंदाज चेक करायचा असेल आणि तुमच्या शहरात किंवा गावात वातावरण नेमकं कस आहे हे बघायचं असेल तर आजच मोबाईल मध्ये Hello Krushi हे अँप डाउनलोड करा. हॅलो कृषीच्या माध्यमातून तुम्हाला सलग ४ दिवसांचा हवामान अंदाज समजतोय. याव्यक्तिरिक्त हॅलो कृषी मध्ये शेतकऱ्याशी निगडित असलेला सातबारा उतारा, जमीन मोजणी, रोजचा पिकांचा बाजारभाव, सरकारी योजना, पशुपालन यासारख्या सर्व सुविधा अगदी फुकट मध्ये मिळत आहेत. त्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi हे अँप डाउनलोड करा.

दरम्यान, येत्या ३-४ तासात महाराष्ट्रात रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळ आणि ताशी ३०-४० किमी वेगाने वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

error: Content is protected !!