Monsoon : पाऊस कधी कोसळणार? अजूनही पेरण्या बाकी, बळीराजा पाहतोय पावसाची वाट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Monsoon : एकीकडे देशात पावसाने थैमान घातले असले तरी राज्यात अजूनही बऱ्याच ठिकाणी पाऊस दडी मारून बसलेला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी पहिला पाऊस झाला की पेरणी केली होती मात्र आता या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवल आहे. (Havaman Andaj)

पूर्ण जून महिना गेला असून जुलै महिन्याचे पंधरा दिवस उलटले आहेत. तरी देखील पाऊस झाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठ संकट ओढावल आहे. अनेक भागात अजूनही पेरण्या बाकी आहेत तर ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत ते शेतकरी देखील पावसाची प्रतीक्षा करत आहेत. यंदा पाऊस नसल्याने मराठवाड्यात तर अत्यंत विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. (Agriculture News)

तुमच्या गावात कधी पाऊस पडणार?

शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर रोजचा हवामान अंदाज जाणून घ्यायचा असेल तर आज तुम्ही प्ले स्टोर वरून आपले Hello Krushi हे मोबाईल ॲप डाऊनलोड करा यामध्ये तुम्हाला रोजच्या हवामान विषयी माहिती मिळेल. तुमच्या गावात कधी पाऊस येणारं याची देखील माहिती मिळेल. त्याचबरोबर फक्त हवामान अंदाजच नाही तर, रोजचे बाजार भाव, सरकारी योजना, पशूंची खरेदी विक्री, जमीन मोजणी इत्यादी गोष्टींची तुम्हाला या ॲपवर माहिती मिळेल त्यामुळे लगेचच प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi हे मोबाईल ॲप डाऊनलोड करा.

मराठवाड्यामध्ये जवळपास 44 टक्के क्षेत्रावरील पेरण्या बाकी आहेत. तर ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत, त्या देखील पाऊस न पडल्याने हातून चालल्या आहेत. खरीप हंगाम सुरु होऊन जवळपास दिड महिना झाला आहे. तरीदेखील मराठवाड्यात सरासरी 146.06 मिमी एवढाच पाऊस पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. राज्यातील बऱ्याच भागात ढगाळ वातावरण निर्माण आहे त्यामुळे लवकरच पाऊस येईल अशी अशा शेतकरी व्यक्त करत आहेत.

error: Content is protected !!