Monsoon Update : यंदा मॉन्सून काळात जोरदार पाऊस; आयएमडीपाठोपाठ ऑस्ट्रेलियन संस्थेचाही दावा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप हंगाम जसजसा जवळ येऊ लागला आहे. तसतसा चातक पक्षासारखा (Monsoon Update) बळीराजा देखील पावसाची आस लावून बसला आहे. यंदाचे पाऊसमान कसे राहणार? खरिपात जोरदार पाऊस होणार की नाही? याबाबत अनेक शेतकऱ्यांना सध्या पावसाळयाच्या तोंडावर प्रश्न पडत आहे. मात्र, आता एल-निनोने भारतातून काढता पाय घेतला आहे. तर याउलट जुलै महिन्यात ला-नीनाची सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता यावर्षी संपूर्ण मॉन्सून (Monsoon Update) काळात भारतात सर्वच भागांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. असे ऑस्ट्रेलियन हवामान संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियन हवामान संस्थेची माहिती (Monsoon Update Australian Weather Organization)

दोनच दिवसांपूर्वी भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) आपला यंदाच्या मॉन्सूनबाबत (Monsoon Update) आपला प्राथमिक अंदाज जाहीर केला आहे. त्यात यंदा देशभरात सरासरीच्या तुलनेत 106 टक्के पाऊस पडणार असल्याचे म्हटले होते. त्यातच आता ऑस्ट्रेलियन हवामान संस्थेनेही आयएमडीच्या पावलांवर पाऊल ठेवत, भारतातून अल-निनो प्रभाव संपुष्टात आल्याचा दावा केला आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. प्रामुख्याने ला-नीना ही अल-निनोच्या विपरीत परिस्थिती असून, ला-नीनाच्या काळात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. असेही या संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे.

जुलै महिन्यात ला-नीना ऍक्टिव्ह होणार

ऑस्ट्रेलियन हवामान संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे की, एप्रिल अखेरच्या आतच भारतातील एल-निनोचा प्रभाव संपला आहे. तो जुलै महिन्यापर्यंत पूर्णपणे न्यूट्रल होणार आहे. अर्थात जुलै महिन्याच्या अगोदर भारतात ला-नीना ऍक्टिव्ह होण्याची कोणतेही चान्सेस नाही. मात्र, जुलै महिना सुरु होताच ला-नीना ऍक्टिव्ह होणार आहे. ज्यामुळे मागील वर्षी ज्या भागात कमी पाऊस पडला असेल. त्या भागात ला-निनाच्या स्थितीमध्ये जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियन हवामान संस्थेसह आतापर्यंत जगभरातील सात आघाडीच्या हवामान संस्थांनी जुलैपर्यंत ला-नीना सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बाब मानली जात आहे.

error: Content is protected !!