Monsoon Update : यंदा देशात सरासरी 106 टक्के पाऊस पडणार; हवामान विभागाचा अंदाज जाहीर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात एकीकडे सूर्य आग ओकत असून, उकाडा कायम (Monsoon Update) आहे. तर काही भागांमध्ये अवकाळी पाऊस बरसत आहे. अशातच आता राज्यासह देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यावर्षी संपूर्ण देशात सरासरीहून अधिक पाऊस पडणार आहे. अर्थात देशात यंदा सरासरीच्या तुलनेत 106 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशी माहिती भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिली आहे. आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी आज (ता.15) ही माहिती जारी केली आहे. इतकेच नाही तर 8 जूनपर्यंत मॉन्सून (Monsoon Update) वेळेत भारतात दाखल होईल, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.

8 जूनपर्यंत मॉन्सून केरळात (Monsoon Update 2024)

यावर्षी संपूर्ण पावसाळ्याच्या काळात सामान्यहून अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आहे. यात प्रामुख्याने 5 जून ते 30 सप्टेंबर याकालावधीत देशभरात 106 टक्के पाऊस पडू शकतो. अर्थात यंदा सामान्यपेक्षा पावसाची परिस्थिती चांगली असणार आहे. याशिवाय 8 जूनपर्यंत मॉन्सून केरळच्या किनारपट्टीवर (Monsoon Update) येण्याची स्थिती आहे. असे हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी म्हटले आहे. दरवर्षी शेतकऱ्यांना भारतीय हवामान विभागाच्या अंदाजाची प्रतिक्षा असते. त्यातच आता हवामान विभागाचा प्राथमिक अंदाज आज जाहीर झाला आहे. त्यामुळे राज्यासह देशभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शेतकऱ्यांना मोठा दिलासा

दरम्यान, अल निनोची परिस्थिती सध्या मॉडरेट आहे. पावसाळा सुरू झाल्यावर अल निनोचा प्रभाव संपुष्टात येईल. सध्या अल निनोचा प्रभाव कमी होतो आहे. त्यामुळे आगामी काळात अल-निनोचा प्रभाव लक्षात घेऊन, मे महिन्याच्या शेवटी पुढील सुधारीत पावसाचा अंदाज जाहीर केला जाईल, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. सध्या भारतीय हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आलेला अंदाज हा पहिला दिर्घकालीन अंदाज असून, त्यानंतर पुढील मान्सूनसंदर्भातील अंदाजामध्ये यंदाच्या पावसाळ्याबाबत अधिक स्पष्टता मिळण्यास मदत होईल. तूर्तास तरी हवामान विभागाच्या या अंदाजामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

error: Content is protected !!