Monsoon Update : बहावा फुलला! मॉन्सूनच्या पावसाचे संकेत देणारे ‘हे’ झाड माहितीये का? वाचा… सविस्तर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी बहावा वनस्पतीला सर्वत्रच मोठ्या प्रमाणात बहार (Monsoon Update) आला आहे. यावरून यंदाचा पाऊस वेळेवर आणि चांगला होईल, असे संकेत मिळाले आहेत. पूर्वीच्या काळी पावसाचा अंदाज घेण्यासाठी कोणती आधुनिक साधने, यंत्रसामग्री नव्हती. परंतु निसर्गच पावसाच्या आगमनाचा संकेत द्यायचा आणि आताही निसर्ग तेच काम करतो. त्यामुळे शेतकर्‍याला पावसाचा अंदाज घेता येत असे. निसर्गातील प्रत्येक झाडाचा फुले, फळे येण्याचा एक विशिष्ट काळ आहे. काही झाडे, वनस्पतींचे काही गुण आहेत. यावर्षी बहावा वनस्पतीला सर्वत्रच मोठ्या प्रमाणात बहार आला आहे. यावरून यंदाचा पाऊस वेळेवर आणि चांगला होईल (Monsoon Update) , असे संकेत मिळाले आहेत.

यंदा बहावा अधिक बहरला (Monsoon Update Nature Indications)

सध्या विज्ञान युगामध्ये पाऊस कधी येणार? हे सांगणारी यंत्रणा, हवामानशास्त्र विभाग प्रगत (Monsoon Update) असले, तरी ग्रामीण भागातील शेतकरी, आदिवासी बांधव हे अनेक गोष्टींवरून पाऊस लवकर येणार की उशिरा येणार? याचा अंदाज घेत असतात. निसर्गच पावसाच्या आगमनाची चाहूल देतो. अनेक वनस्पती या नैसर्गिक बदलाचे संकेत, संदेश देतात. बहावा ही आकर्षक पिवळ्या रंगाची फुले येणारी वनस्पती आहे. बहावा फुलण्याचा मार्च ते मे हा काळ आहे. एप्रिल महिन्यात बहावा ही वनस्पती पूर्णत: फुलून येते. परंतु, यंदा बहावा ही वनस्पती मोठ्या प्रमाणात बहरली आहे. यावरून चांगल्या पावसाचा अंदाज काढता येतो.

पक्षीही देतात पावसाचे संकेत

यंदा वेळेवर आणि चांगला पाऊस (Monsoon Update) होण्याचे संकेत बहावा वनस्पतीने दिले आहेत. निसर्गामध्ये अनेक वनस्पती, झाडे आहेत. त्यांच्या बहरण्यावरून पावसाचा अंदाज काढता येतो. मोहफुले बहरण्यावरून आदिवासी बांधव पावसाचा अंदाज काढतात. त्याचप्रमाणे बहावा या झाडाला किती फुले? यावरून यावर्षी किती प्रमाणात पाऊस पडणार किंवा पावसाळा कसा राहील? याचा अंदाज काढला जातो. याशिवाय अनेक पक्षीही पावसाचे संकेत देत असतात. काही पक्षी त्यांची घरटी झाडाच्या वरच्या टोकाला साकारत असतील, तर यावरून निश्‍चितपणे पाऊस भरपूर येण्याचा अंदाज काढला जातो. तर काही पक्षी हे झाडाच्या पूर्व भागात घरटे बांधत असेल तर त्यावर्षी अधिक पाऊस होण्याचे संकेत मिळत असतात.

error: Content is protected !!