Moog Lagwad : मुगाच्या ‘एमएच 1142’ वाणाची लागवड करा; मिळेल हेक्टरी 20 क्विंटलपर्यंत उत्पादन!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप हंगाम अगदी तोंडावर येऊन ठेपला आहे. अशातच आता शेतकऱ्यांची बियाणे (Moog Lagwad), खते आणि पीक लागवडीबाबतची तयारी सुरु झाली पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे रोहिणी नक्षत्रात तुफान पाऊस पडण्यास सुरुवात झाली की शेतकऱ्यांना यंदाच्या पावसाळ्याबाबत आकलन होण्यास सुरुवात होते. त्यानुसार अनेक शेतकरी आपल्या शेतामध्ये मुळवा बदलण्यासाठी हिरवळीचे पीक म्हणून मुगाची पेरणी करतात. यात प्रामुख्याने मूग उत्पादन मिळवण्यासह, जमिनीचा पोत सुधारणे, असा दुहेरी फायदा होतो. ज्यामुळे शेतकरी मृग नक्षत्राच्या पावसावर मूग पेरणी करत असतात. याच पार्श्वभूमीवर आज आपण मुगाच्या एमएच 1142 या वाणाबाबत (Moog Lagwad) जाणून घेणार आहोत.

एमएच 1142 किफायशीर वाण (Moog Lagwad MH 1142 Variety)

मूग लागवड ही कमी उत्पादन खर्चात अधिक नफा मिळवून देते. मुगाला बाजारात भावही चांगला मिळतो. त्यामुळे मुगाचे एमएच 1142 हे नवे वाण लावल्यास शेतकऱ्यांना आणखी जास्त नफा होऊ शकतो. या वाणाची लागवण केल्यानंतर जास्त उत्पादन खर्च करण्याची गरज नाही. आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर आज शेती सोपी आणि किफायतशीर झाली आहे. त्यामुळे आता मूग या पिकाच्या एमएच 1142 या वाणामुळे शेतकऱ्यांना मूग शेती करताना भरघोस फायदा होऊ शकतो.

रोगांना नाही पडत बळी

एमएच 1142 या वाणाची रोगप्रतिकाशक्ती इतर वाणांच्या तुलनेच चांगली आहे. हे वाण स्वत:चे बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करते. विशेष म्हणजे लागवड केल्यानंतर अवघ्या 63 ते 70 दिवसांत हे पिक काढणीला येते. मुगाची शेती खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात केली जाते. या वाणाची एक विशेषता म्हणजे या वाणाचे प्रत्येक झाड सोबतच काढणीला येते. या वाणाची पाने कमी पसरतात तसेच त्यांच्या झाडांची मर्यादित वाढ होते.

किती मिळते उत्पादन?

एमएच 1142 या मूग वाणाच्या मदतीने 63 ते 70 दिवसांत पीक काढणीला येते. तसेच प्रदेश आणि मातीतील फरकानुसार 12 क्विंटल ते 20 क्विंटल प्रति हेक्टर उत्त्पन्न मिळवून देते. या वाणाची जास्त वाढ होत नसल्यामुळे मुगाची काढणी झाल्यानंतर उर्वरित अवशेषांना जाळण्याचीही गरज भासत नाही. मुगाच्या झाडाचे अवशेष शेतातच कुजून जातात. त्याचा फायदा पुढील पिकास होतो.

error: Content is protected !!