Moog Price : केंद्राकडून खुल्या बाजारात मुगाची विक्री

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशांतर्गत बाजारात महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून राखीव साठ्यातून मूग विक्री (Moog Price) करण्याची योजना बनवली जात आहे. अलीकडेच ‘हॅलो कृषी’कडून “मुग दरात तेजीचे संकेत” या शीर्षकाखाली वृत्त प्रसारित करण्यात आले होते. अर्थात देशात मूग दर (Moog Price) वाढू शकतात, याची कल्पना असल्या कारणाने सरकारनेही आता आपल्या पातळीवर हालचाली सुरु केल्याचे पाहायला मिळत आहे.

यापूर्वी सरकारकडून महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी हरभरा डाळ, गहू (पीठ) आणि कांद्याची खुल्या पद्धतीने विक्री सुरु करण्यात आली आहे. खुल्या बाजारातील मुगाच्या विक्री (Moog Price) या योजनेअंतर्गत नाफेड आणि भारतीय राष्ट्रीय सहकारी उपभोक्ता महासंघ (एनसीसीएफ) या दोन संस्थांना मूग विक्रीचे दायित्व दिले जाणार आहे. सध्यस्थितीत केंद्र सरकारकडे 5 लाख टन मुगाचा राखीव साठा शिल्लक आहे. जो आवश्यक साठ्यापेक्षा (1 लाख टन) बराच अधिक आहे. या योजनेद्वारे पहिल्या टप्प्यात 5 टक्के किंवा 30 हजार टन मूग विक्री करण्यात येणार आहे. यासाठी या दोन्ही संस्थांना समान मुगाचा साठा उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यानुसार या संस्थांना हा मूग खुल्या बाजारात विक्री करावा लागणार आहे.

लवकरच विक्री सुरु होणार (Moog Price In India)

एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, अन्नधान्य महागाईमध्ये डाळींचा मोठा वाटा असतो. त्यामुळे सरकारकडून डाळींच्या किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी पावले उचलली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून नाफेड आणि भारतीय राष्ट्रीय सहकारी उपभोक्ता महासंघ (एनसीसीएफ) या दोन्ही संस्थांना मुगाचा समान साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानुसार त्यांना मूग विक्रीचे निर्देश सरकारकडून देण्यात आले आहे. मात्र या संस्थांकडून याबाबत सुरुवात करण्यात आलेली नाही. लवकरच या दिशेने काम सुरु होण्याची आशा आहे.

107 रुपयांपर्यंत घसरण होणार

सरकारी संस्थेने (नाफेड) 2022-23 या वर्षात शेतकऱ्यांकडून 7755 रुपये प्रति क्विंटल दराने मूग खरेदी केला आहे. ज्याद्वारे डाळ बनवण्यासाठी सरकारला प्रति किलोसाठी एकत्रितपणे 123 रुपये खर्च येतो. मात्र किरकोळ बाजारात मूग डाळीचा दर सध्या 115 रुपये किलो आहे. परिणामी सरकारच्या विक्रीमुळे मूग डाळीच्या दरात १०७ रुपयांपर्यंत घसरण होऊ शकते, असे सांगितले जात आहे.

error: Content is protected !!