Mosambi Rate: मृग बहार मोसंबीला पाचोड बाजार समितीत मिळाला 44 हजार प्रति टन सर्वोच्च दर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: मृग बहार मोसंबीला मिळाला सर्वोच्च दर(Mosambi Rate). होय तुम्ही अगदी बरोबर वाचलात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पाचोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोसंबी मार्केटमध्ये रविवारी मृग बहार मोसंबीला 44 हजार रुपये प्रति टन दर मिळाला आहे. मृग बहार मोसंबीला (Mosambi Rate) आत्तापर्यंत मिळालेला हा सर्वोच्च दर आहे.

पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीचे (Krushi Utpanna Bajar Samiti Paithan) पाचोड येथील मोसंबी मार्केट (Mosambi Market) प्रसिद्ध आहे. या मार्केटमध्ये दरवर्षी आंबा बहार व मृग बहारमधील मोसंबी विक्रीसाठी परिसरातील शेतकरी आणतात. या मार्केटमध्ये खरेदीसाठी मुंबई, तेलंगणा, कोलकाता, दिल्ली आदी ठिकाणांहून व्यापारी येतात. यावर्षी पाचोड परिसरात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने मोसंबीचे उत्पादन (Mosambi production) कमी आहे.

त्यामुळे बाजारात इतर वर्षांच्या तुलनेत यावर्षी मोसंबीची आवक कमीच आहे. रविवारी येथे झालेल्या लिलावात मृग बहार मोसंबीला (Mrug Bahar Mosambi) 44 हजार रुपये प्रति टन भाव मिळाला. रविवारी येथील बाजारात 100 ते 150 टन मोसंबी विकण्यासाठी शेतकर्‍यांनी आणली होती.

पाचोड मोसंबी मार्केट मधील व्यापारी याबाबत बोलताना म्हणाले, मृग बहार मोसंबीसाठी मार्केट सुरू आहे. शेतकरी (Farmers) मोसंबी विक्रीसाठी पाचोडला आणतात. चांगल्या प्रतिच्या मृग बहार मोसंबीला रविवारी तब्बल 44 हजार रुपये प्रति टन भाव मिळाला आहे.

मोसंबीला आतापर्यंतचा सर्वोच्च दर (Mosambi Rate)

मागील वर्षी एप्रिल महिन्यात मृग बहार मोसंबीला सर्वोच्च 20 ते 25 हजार रुपये प्रति टनचा भाव शेतकऱ्यांना मिळाला होता.

यावर्षीच्या मृग बहार मोसंबीला जवळपास दुप्पट म्हणजेच 44 हजार रुपये प्रति टन दर मिळाल्याने या दराने गेल्या सर्व वर्षाचे रेकॉर्ड तुटले आहे. विशेष म्हणजे, आंबा बहार मोसंबीला आतापर्यंत 90 हजाराचा सर्वोच्च दर मिळाला आहे. मोसंबीला मिळणाऱ्या या सर्वोच्च दरामुळे (Mosambi Rate) मोसंबी उत्पादक शेतकरी सध्या समाधानी आहेत.

error: Content is protected !!