Most Expensive Potato: जगातील सर्वात महाग बटाट्याला आहे सोन्याचे भाव! जाणून घ्या किंमत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: बटाट्याची लागवड (Most Expensive Potato) जवळपास सर्वच देशांमध्ये केली जाते. त्याच्या किंमती देखील सर्वत्र भिन्न जरी असल्या तरी फार महाग नाहीत. भारतात बटाट्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. अनेक शेतकरी बटाटे पिकवून भरपूर कमाई करतात. आपल्या देशात बटाट्याचा भाव (Potato Rate) कधी कधी 5 ते 50 रुपये किलोपर्यंत पोहोचते.

परंतु आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात महाग बटाट्याबद्दल (Most Expensive Potato) सांगणार आहोत. ज्याची एक किलोची किंमत ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. कारण की या देशात बटाट्याची किंमत इतकी आहे की तुम्ही त्या किमतीत जवळपास एक तोडे सोने सुद्धा घेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया जगातील सर्वात महाग बटाटा कोणत्या देशात विकला जातो आणि त्याची किंमत काय आहे.

ले बोनोटे’ (Le Bonnotte)
आपण ज्या बटाट्याबद्दल बोलत आहोत त्याचे नाव आहे ‘ले बोनोटे’ (Le Bonnotte). आणि विशेष म्हणजे हा बटाटा फक्त 10 दिवस बाजारात उपलब्ध असतो. या बटाट्याला एवढी मागणी आहे की काही वेळा खूप पैसे देऊनही हा बटाटा मिळत नाही. हा बटाटा बाजारात 56 हजार रुपये किलो दराने विकला जातो. एवढ्या पैशातून आपण कोणत्याही चैनीच्या वस्तू सहज खरेदी करू शकतो.

येथे केली जाते या बटाट्याची लागवड
‘ले बोनोटे’ नावाच्या या बटाट्याची लागवड फ्रान्समधील इले डी नॉयरमाउटियर (Ile de Noi Moutier) बेटावर केली जाते. हे फक्त 50 चौरस मीटर जमिनीत घेतले जाते. या बटाट्याची पेरणी मुख्यतः जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात केली जाते. तर, ‘ले बोनोटे’ तयार होण्यासाठी सुमारे पाच महिने लागतात. खोदताना हा बटाटा आरामात जमिनीतून बाहेर काढावा लागतो. कारण हे बटाटे अतिशय नाजूक असतात. त्याची चव खारट आहे. या बटाट्यामध्ये काही औषधी गुणधर्मही असतात, ज्याचा शरीराला खूप फायदा होतो. सॅलड, सूप इत्यादी स्वरूपातही याचे सेवन केले जाते. हा जगातील दुर्मिळ आणि सर्वात महाग बटाटा (Most Expensive Potato) मानला जातो.

error: Content is protected !!