Mother Dairy : ही… तर विदर्भाच्या दुग्धविकासाची नवीन सुरुवात – गडकरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मदर डेअरीच्या (Mother Dairy) प्रस्तावित 500 कोटींच्या दुग्धप्रक्रिया प्रकल्पाची शनिवारी (ता.25) पायाभरणी करण्यात आली आहे. केंद्रीय दळणवळण आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी, राज्याचे महसूल व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत नागपूर येथे आयोजित ‘ऍग्रो व्हिजन 2023’ कार्यक्रमात दूरदृश्यप्रणालीद्वारे (Mother Dairy) या प्रकल्पालाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय दुग्धविकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. मीनेश शाह, मदर डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक मनीष बंदलीश हे देखील यावेळी उपस्थित होते.

नागपूर येथील बुटीबोरी औद्योगिक वसाहतीत 25 एकरांच्या विस्तीर्ण परिसरात हा प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पाची दररोज 10 लाख लिटर दुधाची प्रक्रिया (Mother Dairy) करण्याची क्षमता असेल. ज्यात आगामी काळात वाढ होऊ शकते. याशिवाय पिशवी बंद दूध, आइस्क्रीम, छास, लस्सी, पनीर या व इतर दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन केले जाणार आहे. त्यामुळे केंद्र सरकार, राज्य सरकार, राष्ट्रीय दुग्धविकास महामंडळ (एनडीडीबी) यांच्या एकत्रित प्रयत्ननाने सुरु होत असलेला हा मदर डेअरीचा प्रकल्प विदर्भ आणि मराठवाड्याच्या दुग्धविकासाची नवीन सुरुवात असल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

भविष्यात क्षमता वाढवावी (Mother Dairy Project In Nagpur)

विदर्भ आणि मराठवाडयातील जवळपास 19 जिल्ह्यांच्या विकासात हा प्रकल्प महत्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे आगामी काळात या प्रकल्पातून दररोज 30 लाख लिटर दुधावर प्रक्रिया यावी, अशी इच्छाही नितीन गडकरी यांनी यावेळी बोलून दाखवली. मदर डेअरीला राज्यात प्रकल्प उभारण्यासाठी संधी देत सहकार्य केल्याबद्दल गडकरी यांनी यावेळी राज्य सरकारचे कौतुक केले आहे.

प्रकल्पाद्वारे प्रगती साधावी

‘मदर डेअरीचा हा प्रकल्प विदर्भातील शेतीपूरक व्यवसायाला प्रोत्साहन देणारा ठरणार आहे. त्यामुळे नागपूर आणि आसपासच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतीसोबतच दुग्धव्यवसायात मोठी प्रगती साधली आहे. त्यामुळे आता विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनीही या प्रकल्पाच्या माध्यमातून दुग्धव्यवसायाद्वारे आपला विकास साधावा, असे राज्याचे महसूल व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यावेळी म्हणाले आहे.

error: Content is protected !!