Mother Dairy : मदर डेअरी ‘या’ जिल्ह्यात लवकरच प्लांट सुरु करणार; 750 कोटींची गुंतवणूक!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील नामंकित दूध उत्पादक संघ ‘मदर डेअरी’ (Mother Dairy) लवकरच आपले दोन प्लांट सुरु करणार आहे. हे दोन्ही प्लांट दूध आणि भाजीपाल्याशी निगडित असणार आहे. यामध्ये एक प्लांट हा महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर या ठिकाणी नियोजित आहे. तर दुसरा प्लांट कर्नाटकात उभारला जाणार आहे. या दोन्ही प्लांटसाठी 750 कोटींचा खर्च केला जाणार असून, येत्या दोन वर्षात हे दोन्ही प्लांट दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुरु होतील, असे मदर डेअरीचे (Mother Dairy) ​​व्यवस्थापकीय संचालक मनीष बंदलिश यांनी म्हटले आहे. एका आघाडीच्या माध्यम समूहाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली आहे.

सहा लाख लीटर क्षमता (Mother Dairy To Set Up Plant In Nagpur)

नागपूर येथे उभारल्या जाणाऱ्या मदर डेअरीच्या प्लांटची क्षमता ही दररोज सहा लाख लीटर इतकी असणार आहे. मात्र, गरजेनुसार या प्लांटच्या माध्यमातून 10 लाख लीटर प्रति दिवस क्षमता वाढवली जाणार आहे. याशिवाय अन्य एका प्लांटमध्ये 100 कोटीची गुंतवणूक केली जाणार आहे. तर कर्नाटकातील सफल ब्रांडअंतर्गत 125 कोटींची गुंतवणूक करून, त्या ठिकाणी देखील नवीन प्लांट उभारला जाणार आहे. ही तीन प्लांट कंपनीच्या पश्चिम-दक्षिण भागामध्ये ब्रँडचा विस्तार करण्यासाठी महत्तवपूर्ण ठरणार आहे. असेही मनीष बंदलिश यांनी म्हटले आहे.

देशातील 100 शहरांमध्ये बाजारपेठ

मदर डेअरीची स्थापना 1974 साली झाली होती. मदर डेअरीकडे दररोज 5 दशलक्ष लिटर दुधाची प्रक्रिया करण्याची क्षमता असून, तिची उत्पादने जवळपास देशभरातील 100 शहरांमध्ये उपलब्ध आहेत. कंपनी दिल्ली, मुंबई, सौराष्ट्र आणि हैदराबाद येथे दररोज 3.2 दशलक्ष लिटर दुधाची विक्री करते. त्याशिवाय कंपनी दुग्धजन्य पदार्थांच्या विस्तृत श्रेणीचे उत्पादन आणि विपणन देखील करते, मदर डेअरीचे दूधाशिवाय,आईस्क्रिम, दही, ताक, श्रीखंड अशी उत्पादने देशभरात प्रसिद्ध आहेत. याशिवाय कंपनीचा सफल हा एक ब्रँड देखील आहे. या ब्रँडमार्फत ताजी फळे आणि भाजीपाला, स्नॅक्स, कडधान्ये आणि इतर पदार्थांची विक्री केली जाते.

error: Content is protected !!