MPKV Rahuri: कृषी विद्यापीठे स्वप्नातील विकसित भारत घडवतील – राज्यपाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : 2047 चा विकसित भारत घडविण्याचे स्वप्न कृषी विद्यापीठांच्या (MPKV Rahuri) प्रयत्नांतून तसेच, या विद्यापीठातून पदवी घेतलेले कृषी पदवीधर आपल्या ज्ञान व कौशल्यानेच साकार करतील, असा विश्वास राज्यपाल तथा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांनी व्यक्त केला आहे. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात 37 व्या पदवीप्रदान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कृषी पदवीधरांना राज्यपाल रमेश बैस हे दूरदृष्यप्रणालीद्वारे (MPKV Rahuri) मार्गदर्शन करताना बोलत होते.

ज्ञानाने शेतकऱ्यांना समृध्द करा (MPKV Rahuri 37th Convocation)

कृषी हा आपल्या देशाचा मुख्य आधार असुन, 58 टक्के पेक्षा जास्त लोक कृषिक्षेत्राशी निगडीत आहेत. या कृषिक्षेत्राच्या भविष्याला आकार देण्यासाठी कृषी विद्यापीठांची भूमिका महत्वाची असणार आहे. कृषी विद्यापीठातून केवळ पदवी घेतलेले पदवीधर विद्यार्थी नसून , तुम्ही नवपरिवर्तनाचे अग्रदुत आहात. महाराष्ट्राला कृषिची समृध्द अशी परंपरा लाभलेली असून, ही परंपरा समर्पक भावनेने जपण्यासाठी तुम्हाला संधी मिळालेली आहे. ज्या शेतकऱ्यांचे जीवन पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. अशा लोकांचे जीवन समृध्द बनविण्यासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करण्याचे आवाहनही राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी कृषी पदवीधरांना केले.

विखे पाटील यांना डॉक्टर ऑफ सायन्स पदवी

यावेळी राज्याचे महसल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महिको कंपनीचे अध्यक्ष राजेंद्र बारवाले व नाशिक येथील सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांनी कृषी क्षेत्रासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल, त्यांना विद्यापीठाकडून डॉक्टर ऑफ सायन्स या मानद पदवीने सन्मानीत करण्यात आले आहे. तसेच विद्यापीठाच्या 73 विद्यार्थ्यांना पीएचडी, 300 विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी व 6 हजार 522 विद्यार्थ्यांना पदवी असे एकुण 6 हजार 895 पदव्या प्रदान करण्यात आल्या. पदवीदान समारंभात 2022-23 मध्ये बी.एस्स.सी (कृषि) पदवीत प्रथम आलेली पुजा नवले, बी.एस्स.सी (उद्यान विद्या) मध्ये प्रथम आलेली ऐश्वर्या कदम, कृषि अभियांत्रिकीमध्ये प्रथम आलेली गौरी चव्हाण यांना सुवर्णपदक व इतर यशस्वी विद्यार्थ्यांना पदके प्रदान करण्यात आली.

error: Content is protected !!