MPKV Rahuri Developed Sensor Base System: राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केली ‘सेंसर बेस’ यंत्रणा! हवामानातील बदलाशी लढण्यासाठी होईल मदत!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: वातावरणातील बदलाचा सामना करण्यासाठी (MPKV Rahuri Developed Sensor Base System) आणि पीक उत्पादनात (Crop Production) वाढ करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील तज्ज्ञांनी ‘सेंसर बेस’ (Sensor Base System) नावाची खास यंत्रणा विकसित केली आहे. ही यंत्रणा शेतकर्‍यांना हवामान बदलाची (Climate Change) अचूक माहिती देऊन योग्य ती पीक व्यवस्थापन रणनीती आखण्यास मदत करते. जाणून घेऊ या विद्यापीठाने विकसित केलेल्या या यंत्रणेबद्दल (MPKV Rahuri Developed Sensor Base System)

कशी आहे रचना (MPKV Rahuri Developed Sensor Base System)

पोर्टेबल यंत्रणा: ही यंत्रणा वापरण्यास पोर्टेबल असून 3 ते 6 हजार रूपयांमध्ये उपलब्ध आहे. तापमान आणि आर्द्रता यासारख्या मूलभूत हवामान घटकांची माहिती या द्वारे मिळते. देते.

अचूक यंत्रणा: 40 हजार ते 2 लाख रूपयांमध्ये उपलब्ध असलेली ही यंत्रणा तापमान, आर्द्रता, पाऊस, वाऱ्याचा वेग आणि सूर्यप्रकाशाचे तास यासारख्या विविध हवामान घटकांची अत्यंत अचूक माहिती देते.

काय आहे यंत्रणेचे फायदे (Benefits of Sensor Base System)

पारंपरिक वेदर स्टेशनपेक्षा ‘सेंसर बेस’ यंत्रणा जलद आणि अधिक कार्यक्षम आहे, त्यामुळे वेळेची बचत होते.

ही यंत्रणा (MPKV Rahuri Developed Sensor Base System) विविध हवामान घटकांची माहिती देते, ज्यामुळे शेतकर्‍यांना अधिकाधिक माहिती मिळाल्याने ते त्यांच्या पिकांचे अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करू शकतात.

शेतकर्‍यांना यंत्रणेद्वारे जमा झालेली हवामान माहिती त्यांच्या मोबाइल ॲपवर (Mobile App) मिळते.

या यंत्रणेचा वापर करून शेतकरी पाणी आणि ऊर्जेची बचत करू शकतात.”

विद्यापीठाने शेतकर्‍यांच्या गरजेनुसार आणि त्यांना परवडणाऱ्या दरात विविध प्रकारची ‘सेंसर बेस’ असलेल्या यंत्रणा विकसित केल्या आहे.

पोर्टेबल यंत्र 3 हजार रूपयांमध्ये उपलब्ध आहे आणि तापमान आणि आर्द्रता याची माहिती देते.

प्रगत लो कॉस्ट हवामान केंद्र 5 हजार रूपयांमध्ये उपलब्ध असलेले हे यंत्र पाऊस, आर्द्रता आणि तापमान याची माहिती देते.

सर्वात प्रगत लो कॉस्ट हवामान केंद्र 7 हजार रूपयांमध्ये उपलब्ध असलेले हे यंत्र तापमान, आर्द्रता, पाऊस, वाऱ्याचा वेग आणि सूर्यप्रकाशाचे तास याची माहिती देते. ‘सेंसर बेस’ यंत्रणा (MPKV Rahuri Developed Sensor Base System) ही हवामानातील बदलाचा सामना करण्यासाठी आणि पीक उत्पादनात वाढ करण्यासाठी शेतकर्‍यांसाठी एक अत्यंत उपयुक्त साधन आहे. त्यामुळे भविष्यात शेतकर्‍यांना हवामान बदलामुळे होणारे नुकसान मोठ्या प्रमाणात नक्कीच टाळता येतील अशी अशा करू या.

error: Content is protected !!