MSP Difference : हमीभावातील फरक देण्यास सरकारची मंजुरी; पहा ‘जीआर’…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील काही शेतमालाचे दर हे सध्या किमान आधारभूत किमतीपेक्षा (MSP Difference) कमी आहे. राज्यात काही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांकडून कमी दरापेक्षा शेतमाल खरेदी केला जातो. मात्र आता केंद्र सरकारच्या किमान आधारभूत किंमत (हमीभाव) जास्त असल्यास आणि बाजार समित्यांनी कमी दरात शेतमाल खरेदी केला असल्यास राज्यातील बियाणे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणारा दर आणि हमीभावातील फरकाची रक्कम (MSP Difference) देण्यास राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे.

राज्य सरकारच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने याबाबत शासन आदेश (MSP Difference) जारी केला आहे. महाराष्ट्र बीज बियाणे महामंडळ मर्यादित अकोला व राष्ट्रीय बीज निगम पुणे यांच्यामार्फत ही योजना शेतकऱ्यांसाठी राबवली जाते. त्यानुसार महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित, अकोला व राष्ट्रीय बीज निगम, पुणे यांच्या कृषी आयुक्तालयामार्फत रुपये 1827.03 लाख इतक्या रकमेच्या प्रस्ताव देण्यात आला होता. या प्रस्तावाला मान्यता देताना वित्त विभागाने 1338 लाख रूपये वितरीत करण्यास कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना मंजुरी दिली आहे.

दुबार पेरणीचे संकट (MSP Difference Approval Of Government)

यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने ओढ दिल्याने आगाऊ पेरण्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पेरण्या संकटात आल्या होत्या. त्यांनतर काही शेतकऱ्यांनी दुबार पेरण्या केल्या होत्या. मात्र ऑगस्ट महिन्यातही पावसाचा खंड पडल्याने राज्यातील शेतकरी संकटात सापडले होते. मात्र आता राज्य सरकारकडून 1338 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याने राज्यातील बिजोत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. हा निधी वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय कृषि, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने प्रस्ताव काढला आहे. या निर्णयात, बीज उत्पादक कार्यक्रमात स्थिरता आणण्याच्या दृष्टीने तसेच शेतकऱ्यांचा बीज उत्पादन कार्यक्रमातील सहभाग वाढविण्यासाठी हमीभाव लागू करण्यात आला आहे.

अधिक माहितीसाठी वाचा जीआर (https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202312291257005601.pdf)

error: Content is protected !!