Mukhyamantri Vayoshree Yojana: महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: वृद्धापकाळात आर्थिक आणि मानसिक मदत मिळावी या उद्देशाने ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री वयोश्री’ (Mukhyamantri Vayoshree Yojana) नावाची नवीन योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वयोश्री योजना प्रमाणेच शिंदे सरकारच्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेत ज्येष्ठ नागरिकांना वेगवेगळे लाभ मिळणार आहेत. या योजनेची वैशिष्ट्ये म्हणजे केंद्र सरकारची राष्ट्रीय वयोश्री योजना काही निवडक जिल्ह्यांमध्येच राबविली जाते मात्र मुख्यमंत्री वयोश्री योजना (Mukhyamantri Vayoshree Yojana) ही राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविली जाईल

या योजनेनुसार 65 वर्षांवरील आणि दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेले ज्येष्ठ नागरिक यांना वार्षिक 3 हजार रुपये आर्थिक (Financial) मदत मिळणार आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे उद्देश (Objectives of Mukhyamantri Vayoshree Yojana)

  • ज्येष्ठ नागरिकांमधील (Senior Citizen) अपंगत्व आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे आणि त्यांचे मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवणे हा आहे.
  • मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी मन:स्वास्थ्य केंद्र आणि योगोपचार केंद्रांमार्फत प्रबोधन आणि प्रशिक्षण

योजनेची अंमलबजावणी हीग्रामीण भागात जिल्हाधिकारी, शहरी भागात आयुक्त यांच्या मार्फत होणार आहे.

लाभार्थ्यांची निवड ही आरोग्य विभागाकडून ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण आणि स्क्रीनिंग केल्यावर, पात्र लाभार्थ्यांची तपासणी केली जाईल व त्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 3 हजार रुपये जमा केले जाईल. या योजनेसाठी एकूण480 कोटी रूपयांचा निधी निर्धारित करण्यात आलेला आहे, व लाभार्थ्यांची एकूण संख्या अंदाजे 15 लाख असल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्र सरकारच्या या योजनेमुळे ज्येष्ठ नागरिक (Mukhyamantri Vayoshree Yojana) यांना मोठी मदत होण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!