Murrah Buffalo : म्हशीची ‘मुऱ्हा’ जात म्हणजे अस्सल सोनं; दररोज होईल मोठी उलाढाल!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात शेतकरी दूध व्यवसाय (Murrah Buffalo) करत आहेत. परंतु दूध व्यवसायात यशस्वी होण्यासाठी जातिवंत जनावराची निवड, दुधाला योग्य दर, दूध व्यवसायाच्या योग्य नियोजनासह सकस चाऱ्याची उपलब्धता या गोष्टींची आवश्यकता असते. आपल्याकडे या सर्व गोष्टी जुळून आल्या की दूध व्यवसायात 90 टक्के यशाची खात्री ही तुम्हाला आधीच मिळालेली असते. त्यामुळे आता तुम्हीही दुधाळ जनावरांच्या शोधात असाल तर म्हशीची ‘मुऱ्हा’ ही सर्वाधिक दूध देणारी प्रजाती तुमच्यासाठी उत्तम ठरू शकते. आज आपण म्हशीच्या मुऱ्हा (Murrah Buffalo) या प्रजातीबद्दल जाणून घेणार आहोत…

किती देते दूध? (Murrah Buffalo Breed Genuine Gold)

कोणतेही दुधाळ जनावर खरेदी करताना आपल्या मनात सर्वात पहिला प्रश्न निर्माण होतो की दूध किती देते? मात्र मुऱ्हा ही म्हशीची (Murrah Buffalo) अशी जात आहे जिच्या पालनातून तुम्ही स्वतःची आणि कुटुंबाची आर्थिक भरभराट करू शकतात. ही म्हैस दररोज सरासरी 25 ते 30 लिटर दूध देते. उत्तरेकडील हरियाणा, पंजाब या राज्यामध्ये तुम्हाला मुऱ्हा ही जातिवंत म्हैस मिळू शकते. याशिवाय उत्तरेकडील बऱ्याच राज्यांमध्ये शेतकऱ्यांनी या म्हशीच्या पालनातून मोठी आर्थिक उलाढाल केली आहे. या म्हशीच्या दुधाच्या गुणवत्तेमुळे ती दही, ताक, तूप आणि लोणी यांसारखे अनेक प्रकारचे दुग्धजन्य पदार्थ बनवण्यासाठी योग्य मानली जाते.

शेतकऱ्यांची पहिली पसंती

मुऱ्हा म्हैस (Murrah Buffalo) ही म्हशीची जात सध्यस्थितीत प्रामुख्याने पंजाब, हरियाणा आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे जास्त प्रमाणात आढळते. एक मुऱ्हा म्हैस दिवसाला 25 लिटर दूध देते. त्यामुळे तुम्ही या म्हशींच्या पालनातून दररोजची 1000 ते 1500 रुपये कमाई हमखास करू शकतात. इतकेच नाही तर महाराष्ट्रात पंढरपुरी म्हैस आणि सुरती म्हैस यांचा देखील दूध देण्याचा आलेख चांगला आहे. मात्र मुऱ्हा म्हशीच्या दुधामध्ये चरबी स्निग्धाचा अंश जास्त असून, तो 7 टक्के इतका आढळतो. त्यामुळे दूध उत्पादनाकांची मुऱ्हा म्हैशीला पहिली पसंती असते.

मुऱ्हा म्हशीची वैशिष्ट्ये

 • मुऱ्हा जातीच्या म्हशीचे शरीर गडद काळे असते.
 • चेहऱ्यावर आणि पायावरही पांढरे डाग दिसतात.
 • पाठीत बाक अर्थात कुबड असते. पण कुबडाचा भाग हलकासा वर आलेला असतो.
 • डोके लांब असते, शेपटी गुडघ्यापर्यंत लांब असते आणि पाय लहान व मजबूत असतात.
 • या जातीच्या म्हशीचे सरासरी वजन 450 किलो आणि उंची सुमारे 132 सेमी असते.
 • या जातीच्या रेड्याचे सरासरी वजन 550 किलो आणि उंची सुमारे 142 सेमी असते.
 • एका वेताला 1600-1800 लिटर दूध देते.
 • एका वेताला 310 दिवस दूध देण्याची क्षमता असते.
 • विशेष काळजी घेतल्यास या जातीच्या म्हशी अधिक दूध देतात.
 • शिवाय या जातीच्या म्हशीच्या दुधाला 7 टक्क्यांपर्यंत फॅट मिळतो.
 • या म्हशीची पारडी 45 ते 50 महिन्यांच्या वयात पहिल्यांदा दूध देण्यास सुरुवात करते.
 • पारडी लहान असताना योग्य ती काळजी घेतल्यास हा कालावधी 36 ते 40 महिने इतका कमी देखील होऊ शकतो.

किती असते किंमत?

तुम्हीही म्हैस खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हांला या जातीच्या म्हशी 50 हजार ते एक लाख रुपयांपर्यंतच्या किंमतीत मिळू शकतात. या जातीच्या म्हशींची जितकी जास्त काळजी आणि योग्य नियोजन करत संगोपन केल्यास त्या तितक्या अधिक दूध देतात. त्यामुळे तुम्हीही याजातीच्या म्हशीच्या संगोपनातून मोठ्या प्रमाणात नफा कमावू शकतात.

error: Content is protected !!