हॅलो कृषी ऑनलाईन : भारत हा कृषिप्रधान देश असून, आपल्या देशात शेती मातीची (Murrah Buffalo) एक विशिष्ट संस्कृती आहे. आपल्या कृषिप्रधान संस्कृतीमध्ये गाय, बैल, म्हैस या प्राण्यांना विशिष्ट सणांना खूप महत्व देखील दिले जाते. गाय, बैल, म्हैस यांची शेतकरी मनोभावे पूजा करतात. या प्राण्यांचे आपले एक विशिष्ट महत्व असल्याने, शेतकरी त्यांच्यावर मोठा खर्च करण्यासह जीव ओवाळून टाकतात. इतकेच नाही तर हे प्राणी देखील शेतकऱ्यांना आपला घरगाडा चालवण्यासाठी मोठा हातभार लावत असतात. अशातच आता एका मुऱ्हा जातीच्या रेड्याची सर्वत्र चर्चा होत असून, त्याची 10 कोटी ही किंमत (Murrah Buffalo) ऐकून तुम्हीही नक्कीच अवाक व्हाल.
सध्या बिहारची राजधानी पटना येथे वेटनरी कॉलेजच्या मैदानात पशु मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये हरियाणा येथील शेतकरी नरेंद्र सिंह यांनी आपल्या रेड्याला प्रदर्शनामध्ये ठेवले आहे. नरेंद्र आपल्या रेड्याला प्रेमाने ‘गोलू-2’ नावाने हाक मारतात. या रेड्याची किंमत जवळपास 10 कोटी रुपये इतकी असून, तो 6 वर्षांचा आहे. गोलू-2 हा दिसायला धिप्पाड (Murrah Buffalo) असून, त्याचे वजन सुमारे 15 क्विंटल इतके आहे. गोलू-2 या रेड्याची उंची सुमारे साडेपाच फूट आहे. त्याचा रूबाबदारपणा, दिसायला असलेला टापटीपणा आणि त्याच्या शरीरावर असलेले तेज पाहून अनेक जण त्याला पाहण्यासाठी एकच गर्दी करत आहे. मंगळवारपासून सुरु झालेल्या या मेळाव्याचा आज शेवटचा दिवस असून, गेले पाच दिवस गोलू-2 येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. गोलूची ही तिसरी पिढी असून, त्याचे आजोबा, वडील गोलू-1 आणि गोलू-2 असा विस्तार झाल्याचे नरेंद्रसिंह सांगतात.
गोलू-2 आहारावरील खर्च (Murrah Buffalo Earns 25 Lakhs Annually)
शेतकरी नरेंद्र सिंह गोलू-२ च्या आहारावर करत असलेला खर्च ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. मात्र त्याच्या सीमेन विक्रीतून वार्षिक 25 लाखांची कमाई होत असल्याने आपण त्याच्यावरील खर्चाचा विचार करत नसल्याचे नरेंद्र सिंह सांगतात. गोलू-2 हा रेडा दररोज 35 किलो हिरवा चारा आणि हरभरा खातो. याच सोबत रोज 7-8 किलो गुळाचा त्याच्या (Murrah Buffalo) आहारात समावेश होतो. त्याचसोबत कधीकधी त्याला तूप आणि दूध दिले जाते. मात्र सुका मेव्याच्या त्याच्या आहारात समावेश नसतो. त्याच्या जेवणावर मासिक जवळपास 30-35 हजार रुपये खर्च होतो, असे शेतकरी नरेंद्र सिंह सांगतात. गोलूच्या देखभालीसाठी कुटुंबातील सर्वजण एकत्र येतात. चांगल्या सीमेनचा उपयोग करून, उत्तम प्रतीच्या दूध देणाऱ्या म्हशींची पिढी तयार होईल. यासाठी आपण काम करत आहोत, असे नरेंद्र सिँह सांगतात.
पद्मश्री पुरस्काराने सन्मान
शेतकरी नरेंद्र सिंह हे व्यवसायाने पशुपालक असून, 2019 मध्ये पशु उत्पादनातील योगदानाबद्दल त्यांना केंद्र सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने (Murrah Buffalo) गौरविण्यात आले आहे. गोलू-2 या रेड्याची केवळ भारतात नाही तर विदेशातही खूप मागणी आहे. गोलू-2 हा देशभरातील मेळाव्यांमध्ये जातो आणि स्पर्धेत भाग घेतो. हा रेडा ठिकठिकाणी मेळाव्यांमध्ये भाग घेऊन आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. नरेंद्र सिंह सांगतात, गोलू-2 ला देशभरात घेऊन फिरतो. लम्पी आजारामुळे गेली दोन वर्ष गोलूला कोणत्याही स्पर्धेत सहभागी केले नाही. गोलू सध्या सहा वर्षांचा असून, वयाच्या 20 वर्षांपर्यंत आपण त्याला खूप जपणार आहे. असेही ते शेवटी सांगतात.