Muscle Print Technology: ‘मसल प्रिंट’ तंत्रज्ञानाचा वापर करणारे महाराष्ट्र पहिले राज्य! 30 हजार गायींमध्ये होणार या तंत्रज्ञानाचा वापर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Table of Contents

हॅलो कृषी ऑनलाईन: जनावरांची (Muscle Print Technology) ओळख पट‍वण्यासाठी आणि त्यांच्या माहितीचा मागोवा ठेवण्यासाठी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ (Maharashtra Livestock Development Board) यांनी आधुनिक ‘मसल प्रिंट’ तंत्रज्ञानाचा (Muscle Print Technology) वापर करणार आहे. या तंत्रज्ञानाचा प्रायोगिक वापर राज्यातील 30 हजार गायींवर (Cow) केला जाणार असल्याची माहिती मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सतीश राजू यांनी दिली.

सध्या जनावरांची ओळख पट‍वण्यासाठी कानात टॅग (Animal Tagging) लावले जातात. मात्र हे टॅग कधीकधी हरवू शकतात किंवा खराब होऊ शकतात. यामुळे जनावरांची माहिती (Livestock Information) मिळवणे कठीण होते. ‘मसल प्रिंट’ तंत्रज्ञान (Muscle Print Technology) या समस्येवर उपाय योजना करते.

या तंत्रज्ञानाद्वारे, जनावराच्या नाकाजवळील काळ्या भागाचा स्कॅन घेऊन त्यावर माहिती नोंदविली जाते. ही माहिती विशिष्ट स्कॅनरद्वारे वाचली जाऊ शकते. जनावराची जात, वय, लिंग, आरोग्य इतिहास आणि इतर माहिती ‘मसल प्रिंट’ मध्ये समाविष्ट असू शकते.

डॉ. राजू यांनी सांगितले की, “हे तंत्रज्ञान जनावरांची चोरी आणि तस्करी रोखण्यास मदत करेल. तसेच, पशुधन विकास कार्यक्रमांचे प्रभावी अंमल बजावणीसाठीही ते उपयुक्त ठरेल.”

‘मसल प्रिंट’ तंत्रज्ञानाचा वापर करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य बनणार आहे. या तंत्रज्ञानासाठी केंद्र सरकारने ईव्हर्स कंपनीसोबत करार केला आहे.

या तंत्रज्ञानाचे फायदे (Muscle Print Technology)

Ø  जनावरांची अचूक आणि सहज ओळख करता येईल

Ø  कानातील टॅग गमावल्यासही माहिती उपलब्ध होईल

Ø  जनावरांची चोरी आणि तस्करी रोखण्यास उपयुक्त तंत्रज्ञान

Ø  पशुधन विकास कार्यक्रमांचे प्रभावी अंमलबजावणी करता येईल

Ø  जनावरांच्या आरोग्य व्यवस्थापनात सुधारणा करता येईल

‘मसल प्रिंट’ तंत्रज्ञान (Muscle Print Technology) हे पशुधन व्यवस्थापनात क्रांती घडवून आणण्याची क्षमता असलेले एक आधुनिक तंत्रज्ञान आहे. महाराष्ट्रात या तंत्रज्ञानाचा वापर केल्याने जनावरांची माहिती व्यवस्थापन सुधारण्यास आणि पशुधन क्षेत्रात अनेक फायदे मिळण्यास मदत होईल.

error: Content is protected !!