Mushroom Farming : मशरूम शेतीतून गावाने साधली प्रगती; शेतकऱ्यांना वर्षाला होतोय 2 कोटींचा नफा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबातील सदस्यांना (Mushroom Farming) शेतीत काम नसेल तर रोजंदारीने जावे लागते. सध्याच्या घडीला शेतीमधून अपेक्षित उत्पन्न मिळणेही मुश्किल झाले आहे. ज्यामुळे कुटुंबाचा उदनिर्वाह चालवण्यासाठी शेतकरी कुटुंबातील सदस्यांना रोजंदारीने काम करावे लागते. मात्र, सध्याच्या घडीला एक गाव असे आहे. जेथील जवळपास सर्वच शेतकरी कुटुंब हे मशरूम शेती करत आहेत. विशेष म्हणजे मशरूम उत्पादनातून या गावातील सर्व कुटुंब जवळपास दररोजची सहा लाखांची उलाढाल (Mushroom Farming) होत असल्याचे स्थानिक शेतकरी सांगतात.

रोजंदारीवरील भटकंती थांबली (Mushroom Farming Orissa Village)

ओडिशा राज्यातील गंजम जिल्ह्यातील राधामोहनपुर असे या गावाचे नाव असून, या गावातील शेतकरी कुटुंबांचे मशरूम शेतीमुळे नशीब बदलले आहे. गावातील शेतकरी कुटुंबाचे आर्थिक परिस्थिती (Mushroom Farming) सुधारली आहे. ज्यामुळे आता या गावातील शेतकरी कुटुंबातील सदस्यांना कुठेही कामानिमित्त वणवण भटकंती करावी लागत नाही. यापूर्वी राधामोहनपुर गावात मोठ्या प्रमाणात पान शेतीची केली जात होती. या ठिकाणचे शेतकरी हे मोठ्या प्रमाणात पानाचे उत्पादन घेत होते. तसेच उत्पादित सर्व पान हे उत्तरप्रदेशातील बाजार पेठांमध्ये पाठवले जात होते.

राज्यासह आंध्रप्रदेशात विक्री

मात्र, किनारपट्टी भाग असल्याने राधामोहनपुर गावात नेहमीच पान शेती घोक्यात येऊ लागली. अशातच 2005 मध्ये एका निवृत्त सरकारी अधिकारी असलेले पी. के.पटनायक यांनी २००५ साली मशरूम शेतीचा (Mushroom Farming) प्रथमच प्रयोग केला. ज्यात त्यात मिळत असलेले यश पाहून आज सर्व गाव मशरूम करत आहे. स्थानिक तरुणांनी मशरूम शेतीबाबत गावात एक ग्रुप बनवला आहे. हा ग्रुप गावात उत्पादित मशरूम आंध्रप्रदेश आणि ओडिसा राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये विक्रीसाठी पाठवला जातो.

वार्षिक 2 कोटींचा निव्वळ नफा

गावातील तरुणांच्या ग्रुपचे सदस्‍य झिली साहू यांनी सांगितले आहे की, गावात सध्या सर्व कुटुंबे मशरूम उत्पादन करत असून, गावातील सर्वांची मिळून दररोज सहा लाखांची नियमित उलाढाल होत आहे. अर्थात दररोज संपूर्ण गावातील कुटूंबांना एकूण वार्षिक २ कोटींचा निव्वळ नफा मिळत आहे. मशरूम शेतीमुळे गावातील कुटुंबांचे जीवन समृद्ध झाले असून, सर्वांची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे. ज्यामुळे सध्या आता कोणालाही बाहेर रोजंदारीसाठी भटकंती करावी लागत नसल्याचे साहू यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!