Mushroom Farming : मशरूमची शेती ठरत आहे फायदेशीर; 45 दिवसात होणार बक्कळ कमाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात मशरुमची शेती ही अधिकाधिक फायदेशीर आहे. या शेतीपासून शेतकरी लाखो रुपयांच्या घरात उत्पन्न मिळवत आहेत. यामुळे याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होता. देशात मशरुमची शेती ही अधिकाधिक बिहारमध्ये पहायला मिळते. त्याआधी ओडीशा हे राज्य क्रमांक एकवर पहायला मिळत होते. या शेतीसाठी केंद्रातून ७५ टक्के अनुदान दिले जाते. यातून उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांना मशरूम शेती करण्यासाठी ४० टक्के अनुदान मिळते.

मशरूमच्या लागवडीसाठी मशरुमच्या काही जाती आहेत. त्यापैकी ओएस्टर जातीचे मशरूम हे उत्पादनासाठी अधिकाधिक फायदेशीर आहे. कारण या जातीच्या मशरूमचे उत्पादन केलं तर, उन्हाळ्यात लागवडीसाठी अधिकाधिक फायदा होतो. यामुळे मशरूममध्ये चांगल्या पद्धतीने वाढ होत असून या जातीच्या मशरूमचे वजन हे २५० ग्रॅम असते. तसेच मशरुमची शेती करण्यासाठी मशरूमच्या शेतीतून येणारा नफा जाणून घेणं आवश्यक आहे.

मशरूम बीजांचे रोपण केल्यानंतर ३० ते ४५ दिवसांत मशरूमचे उत्पादन होते. एका बॅगपासून शेतकरी १५० ते २०० रुपये मिळवू शकतात. एक बॅग मशरूम उगवण्यासाठी ५० रुपये खर्च येतो. शेतकरी हे मशरूम विकत असतील तर त्यांना १५० रुपये शुद्ध नफा मिळतो. मात्र या शेतीसाठी योग्य हवामानाची आवश्यक असते. तसेच इतरही बाबींची आवश्यकता असणे गरजेचे आहे.

मशरूमसाठी आवश्यक या बाबी :

ओएस्टर जातीसाठी २५ ते ३५ डिग्री सेल्सिअस तापमान हवे. या मशरूम लागवडीतून शेतकरी ४५ दिवसांत उत्पन्न घेऊ शकतात. गव्हाप्रमाणे मशरूमची शेती केली जाते. भुशात ओएस्टरचे बीज टाकून ३० ते ४५ दिवसात मशरूमची शेती केली जाते.

error: Content is protected !!