Nagpuri Buffalo : ‘नागपुरी म्हैस’ डेअरी व्यवसायात मिळवून देईल भरभराट; वाचा… किंमत?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात सध्या शेतकरी दुग्ध व्यवसायाला (Nagpuri Buffalo) मोठ्या प्रमाणात प्राधान्य देत आहे. शेतीला जोडधंदा म्हणून केल्या जाणाऱ्या या व्यवसायामुळे राज्यातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक भरभराट झाली आहे. त्यामुळे आता तुम्ही देखील नव्याने एखादी जातिवंत म्हैस खरेदी करण्याचा विचार करणार असाल. तर आज आपण महाराष्ट्रातील प्रसिद्ध नागपुरी म्हशीबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. तुम्ही ‘नागपुरी म्हैस’ (Nagpuri Buffalo) या जातिवंत म्हशीच्या संगोपनातून मोठ्या प्रमाणात आर्थिक नफा मिळवू शकतात.

या म्हशीचे मुळस्थान कोणते? (Nagpuri Buffalo)

नागपुरी म्हैस ही मूळची महाराष्ट्राच्या विदर्भ प्रांतातील गावरान म्हैस आहे. मध्य भारतातील प्रमुख स्थान असलेल्या नागपूरच्या आसपास परिसरात आढळते. त्यामुळे या जातीच्या म्हशीला ‘नागपुरी म्हैस’ (Nagpuri Buffalo) म्हणून संबोधले जाते. या जातीची म्हशीचे मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे ती दुष्काळ आणि इतर खडतर परिस्थितही तग धरून राहते. नागपुरी म्हशीच्या बेरारी, गावराणी, पूर्णाथडी, वऱ्हाडी, गवळाऊ, आर्वी, गंगौरी, शाही, एलीचपुरी आणि चंदा अशा उपजाती पाहायला मिळतात.

किती दूध देते?

नागपूर म्हैस ही कमी आहारात आणि अगदी बिकट परिस्थितीमध्ये देखील तग धरून राहते. तिच्या चारा पाण्याकडे दुर्लक्ष झाल्यास तिच्यावर फारसा परिणाम होत नाही. त्यामुळे ती अधिक दूध देणाऱ्या म्हशींच्या जातींमध्ये गणली जाते. नागपुरी म्हैस आपल्या एका वेताच्या काळात जवळपास अकराशे लिटरपर्यंत दुध देण्यासाठी सक्षम असते.

नागपुरी म्हशीचे वैशिष्ट्ये?

  • नागपुरी म्हशीचे (Nagpuri Buffalo) शरीर उत्तर भारतात आढळणाऱ्या इतर म्हशींच्या तुलनेत लहान आणि वजन तुलनेने कमी असते.
  • नागपुरी म्हशीच्या शरीराचा रंग सामान्यतः काळा असतो. याशिवाय या म्हशीच्या चेहऱ्यावर, पायांवर आणि शेपटीच्या टोकावर पांढरे डाग पाहायला मिळतात.
  • नागपूरी म्हशीचे शिंगे लांब असतात. तसेच शिंगे सपाट, वाकलेले असतात आणि दोन्ही शिंगे मानेच्या बाजूला जवळजवळ खांद्यापर्यंत निमुळती असतात.
  • नागपुरी म्हशीचा चेहरा सरळ आणि पातळ असतो. या म्हशीची मान लांब असते.
  • या जातीच्या म्हशीची शेपटी ही आखूड असते.
  • नागपुरी म्हशीच्या रेड्याची उंची ही सरासरी 145 सेमी असते. तर नागपुरी म्हशीची सरासरी उंची ही 135 सेमी इतकी असते.

किती असते किंमत?

साधारणपणे अधिक दूध देण्यास सक्षम असणारी ही म्हैस आपल्या गुणवैशिष्ट्यांमुळे शेतकऱ्यांच्या नेहमीच पहिली पसंती असते. त्यामुळे तिला बाजारात किंमत अधिक असल्याचे पाहायला मिळते. नागपुरी म्हैस ही जवळपास 90 हजार रुपयांपर्यंत मिळते. त्यामुळे आता तुम्ही देखील दुग्ध व्यवसायात अधिक नफा मिळवण्याचा विचार करत असाल तर नागपुरी म्हैस तुमच्यासाठी योग्य जात ठरू शकते.

error: Content is protected !!