Sarkari Yojana : नमो महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी शासनाचा निधी मंजूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Sarkari Yojana : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत देण्यात येणा-या प्रति वर्ष, प्रति शेतकरी रु. ६००० या अनुदान दिले जाते. या अनुदानात राज्य शासनाची आणखी रु. ६००० इतक्या निधीची भर घालणारी “नमो शेतकरी महासन्मान निधी” ही योजना राबविण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.

या योजनेच्या माध्यमातून राज्य शासनाकडून पात्र शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार रुपये मिळणार आहेत. शेतकऱ्यांना एप्रिल ते जुलै 2023 या कालावधीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. केंद्र व राज्य सरकारचे मिळून एकूण 12 हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत पहिल्या हप्त्यापोटी (माहे एप्रिल ते जुलै) रु. १७२०.०० कोटी इतका निधी वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यासंबंधीचा शासननिर्णय 10 ऑक्टोबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. सन २०२३ – २४ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ ही योजना घोषित करण्यात आली होती.

error: Content is protected !!