शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नमो शेतकरी योजनेचे 2 हजार रुपये बँकेत खात्यात जमा होणार; फक्त ‘हे’ महत्वाचे काम आजच करून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Namo Shetkari Yojana : नमो प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने जाहीर केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतील पहिला हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकर देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. निधीचे वितरण पीएफएमएस प्रणालीतून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केले जाणार असल्याने त्यामध्ये योजनेची नोंदणी करण्यात आलेली आहे. या योजनेला पात्र होण्यासाठी शेतकऱ्यांनी शासनाच्या अटींची पूर्तता करणे गरजेचे आहे.

आजच करून घ्या ‘हे’ महत्वाचे काम

महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेची घोषणा करून ४ हजार कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला आहे. सरकारी योजनेचे सर्व अपडेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच तुम्हाला एक महत्वाचे काम करणे गरजेचे आहे. मोबाईलवरील गुगल प्ले स्टोअर ओपन करून Hello Krushi नावाचे अँप इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. या अँपवर तुम्हाला सरकारच्या सर्व योजनांची माहिती देण्यात येते. तसेच रोजचे बाजारभाव, हवामान अंदाज, जमीन मोजणी, सातबारा उतारा डाउनलोड करणे आदी सेवा मोफत दिल्या जातात.

पी.एम.किसान योजनेप्रमाणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे मॉड्युल महाडीबीटी पोर्टलवर विकसित करण्याचे काम महाआयटीकडून सुरू आहे. पीएफएमएस प्रणालीमध्ये तांत्रिक कार्यवाही करण्यासाठी आवश्यक कालावधी कमी करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे यावेळी कृषी मंत्री श्री. मुंडे यांनी सांगितले. पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने घोषित केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पहिला हप्ता लवकरच वितरित करण्यात यावा, या अनुषंगाने सुरू असलेल्या कार्यवाहीचा श्री. मुंडे यांनी आज आढावा घेतला.

पावसाळी अधिवेशनात नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी 4 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यातून शेतकऱ्यांना दोन हप्ते वितरित करणे शक्य आहे, पावसाने ओढ दिलेल्या क्षेत्रातील अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या रकमेचीही मदत होऊ शकते, त्यादृष्टीने तातडीने पहिला हप्ता वितरित करण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे, असे यावेळी कृषिमंत्र्यांनी सांगितले.

पीएम किसान योजनेतील निकषांची पूर्तता न झालेल्या 12 लाख शेतकऱ्यांच्या बाबतीत सर्व अटींची पूर्तता करण्यासाठी राज्यात विशेष मोहीम राबवली जात आहे. या अंतर्गत आतापर्यंत 4 लाख शेतकऱ्यांनी सर्व अटींची पूर्तता केली आहे. सर्व उर्वरित पात्र शेतकरी बांधवांनी ई-केवायसी, भूमिअभिलेख नोंदी अद्ययावत करणे, बँक खात्याला आधार संलग्न करणे आदी बाबींची पूर्तता करून या दोनही योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

error: Content is protected !!