Namo Shetkari Yojana : राज्यात प्रत्येक शेतकऱ्याला 6000 रुपये मिळाले; घरबसल्या चेक करा तुमचे पैसे!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील लाभधारक शेतकऱ्यांना (Namo Shetkari Yojana) आज पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता जारी केला आहे. महाराष्ट्रातील यवतमाळ येथील जाहीर कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी हा 2000 रुपयांचा 16 वा हप्ता जारी केला. यावेळी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आज राज्य सरकारच्या ‘नमो शेतकरी महासन्मान योजनेचे’ दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे प्रत्येकी 2000 हजार रुपये देखील पंतप्रधान मोदी यांनी वितरित केले आहे. त्यामुळे आज महाराष्ट्रातील लाभधारक शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचे एकूण 4000 रुपये आणि पीएम किसान योजनेचे 2000 रुपये असे एकूण 6000 रुपये मिळाले आहेत. याचा राज्यातील जवळपास 88 लाख लाभधारक शेतकऱ्यांना (Namo Shetkari Yojana) थेट लाभ मिळाला आहे.

पीएम किसानसाठी 21,000 कोटींचा निधी (Namo Shetkari Yojana For Farmers)

केंद्र सरकारने देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देण्यासाठी 16 व्या हप्त्यासाठी 21,000 कोटींचा निधी जारी केला आहे. तर महाराष्ट्रातील ‘नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या’ (Namo Shetkari Yojana) दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्यासाठी राज्य सरकारकडून एकूण 3,800 कोटींचा निधी जारी करण्यात आला आहे. नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या धर्तीवर वार्षिक 6000 रुपये तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. तुम्हाला आपले नमो शेतकारी महासन्मान योजनेचे स्टेटस चेक करायचे असल्यास पुढील दिलेल्या काही स्टेप्स फॉलो करून, तुम्ही ते घरबसल्या मोबाईलवर चेक करू शकतात.

अशी चेक करा ‘नमो शेतकरी योजने’च्या हप्त्यांची स्थिती?

 • तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून, तुमच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या (Namo Shetkari Yojana) दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्यांची स्थिती घरबसल्या चेक करू शकतात. याशिवाय तुमचा नोंदणी क्रमांक माहिती असेल तर त्यावरूनही तुम्ही डिजिटल सेवा केंद्रात योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याची स्थिती पाहू शकतात.
 • ‘नमो शेतकरी योजने’ची स्थिती तपासण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या (https://nsmny.mahait.org/) या संकेतस्थळावर जावे लागेल.
 • त्या ठिकाणी तुम्हाला उजव्या बाजूला लॉगिन आणि लाभार्थी स्टेटस असे दोन पर्याय दिसतील.
 • त्यापैकी हप्त्यांची स्थिती तपासण्यासाठी तुम्हाला लाभार्थी स्टेटस किंवा बेनेफिशरी स्टेटस यावर क्लिक करायचे आहे.
 • त्यानंतर तुमच्या समोर एक पेज ओपन होईल. त्या ठिकाणी तुम्हांला मोबाईल नंबर किंवा नोंदणी क्रमांक असे दोन पर्याय दिसतील.
 • तुम्ही त्या ठिकाणी मोबाईल नंबर किंवा मग नोंदणी क्रमांक या पैकी कोणताही क्रमांक टाकू शकतात.
 • तुमचा मोबाईल नंबर टाका. कॅप्च्या कोड भरा. आणि ‘गेट डेटा’ या पर्यायावर क्लिक करा.
 • तुम्हाला तुमची ‘नमो शेतकरी योजने’च्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्यांची स्थिती समोर ओपन होईल.

नोंदणी क्रमांक विसरलाय?

जर ‘नमो शेतकरी योजने’च्या (Namo Shetkari Yojana) दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्यांची स्थिती तुमच्या मोबाईल क्रमांकावर दिसत नसेल तर तुम्ही नोंदणी क्रमांकाच्या माध्यमातून तुमची स्थिती चेक करू शकतात. जर नोंदणी क्रमांकही तुम्ही विसरला असेल तर चिंता करू नका. त्या ठिकाणी तुमच्या समोर ‘तुमचा नोंदणी क्रमांक तपासा’ असा हिरव्या पट्टीत वरती ऑप्शन तुम्हाला दिसेल. त्यावर क्लिक करा.

त्यानंतर आधार क्रमांक या ऑप्शन वर क्लिक करा. त्या ठिकाणी बॉक्समध्ये तुमचा आधार क्रमांक टाका. आणि कॅप्च्या कोड भरून, ‘गेट आधार ओटीपी’ या पर्यायावर क्लिक करा. तुमच्या आधार कार्डसोबत लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर सहा अंकी ओटीपी येईल. तो ओटीपी त्या ठिकाणी टाका. त्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर तुमचा ‘नमो शेतकरी योजने’चा नोंदणी क्रमांक ओपन होईल. त्यानंतर तुम्ही तुमचा नोंदणी क्रमांक टाकूनही योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याची स्थिती तपासू शकतात.

अशी चेक करा पीएम किसानच्या 16 व्या हप्त्याची स्थिती

 • जे शेतकरी आपल्या 16 व्या हप्त्याची स्थिती चेक करू इच्छिता. त्यांनी सर्वप्रथम पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेच्या https://pmkisan.gov.in अधिकृत वेबसाईटवर जावे.
  -‘फार्मर कॉर्नर’ वर क्लिक करा. त्यानंतर Beneficiary Status वर क्लिक करा.
 • त्यानंतर आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाकून कैप्चा कोड भरा.
 • ‘गेट स्टेटस’ वर क्लिक करा.
error: Content is protected !!