Namo Shetkari Yojna : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता लवकरच जमा होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Namo Shetkari Yojna : राज्य सरकार तसेच केंद्र सरकार शेतकऱ्यांना अर्थिक सहाय्य मिळावे म्हणून अनेक योजना राबवत असते. या योजनांचा लाभ अनेक शेतकरी घेतात. दरम्यान, पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळणार आहे. या योजनेचा जाऊन एकही हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेला नाही. मात्र आता पहिला हप्ता लवकरच वितरित करण्यात यावा, या अनुषंगाने सुरू असलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला आहे.

पावसाळी अधिवेशनात नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी 4 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यातून शेतकऱ्यांना दोन हप्ते वितरित करणे शक्य आहे, पावसाने ओढ दिलेल्या क्षेत्रातील अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या रकमेचीही मदत होऊ शकते, त्यादृष्टीने तातडीने पहिला हप्ता वितरित करण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे.

पीएम किसान योजनेतील निकषांची पूर्तता न झालेल्या 12 लाख शेतकऱ्यांच्या बाबतीत सर्व अटींची पूर्तता करण्यासाठी राज्यात विशेष मोहीम राबवली जात आहे. यांतर्गत आतापर्यंत 4 लाख शेतकऱ्यांनी सर्व अटींची पूर्तता केली आहे. सर्व उर्वरित पात्र शेतकरी बांधवांनी ई-केवायसी, भूमिअभिलेख नोंदी अद्ययावत करणे, बँक खात्याला आधार संलग्न करणे आदी बाबींची पूर्तता करून या दोनही योजनांचा लाभ घ्यावा. अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

‘या’ ठिकाणी घ्या सरकारी योजनांची माहिती

राज्य सरकारने तसेच केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक नवनवीन योजना सुरू केल्या आहेत मात्र अजूनही तुम्हाला या योजनांची माहिती नसेल तर टेन्शन घेऊ नका आता Hello Krushi या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला सर्व सरकारी योजनांची सविस्तरपणे माहिती मिळणार आह. त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर लगेचच गुगल प्ले स्टोअर वर जा आणि आपले हॅलो कृषी हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा. या ॲपच्या माध्यमातून तुम्ही फक्त सरकारी योजनाच नाही तर रोजचा हवामान अंदाज, बाजार भाव, पशुंची खरेदी विक्री, जमीन मोजणी, सातबारा उतारा, डिजिटल सातबारा, इत्यादी गोष्टींची माहिती घेऊ शकता. त्यामुळे लगेचच हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा.

error: Content is protected !!