Namo Shetkari Yojna : नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता कधी मिळणार शेतकऱ्यांना? वाचा अपडेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Namo Shetkari Yojna : शेतकऱ्यांना शेती करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे केंद्र सरकार तसेच राज्य सरकार शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करत असते. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून पंतप्रधान किसान सन्मान निधी ही योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळतात. ही योजना शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची असून आतापर्यंत या योजनेचे 14 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत.

त्यामुळे केंद्र सरकारच्या या योजनेच्या धर्तीवरच महाराष्ट्र सरकारने देखील नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याबाबत घोषणा करण्यात आली होती. पी एम किसान योजनेसाठी जे शेतकरी पात्र आहेत त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Namo Shetkari Yojna)

किती पैसे मिळणार?

नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहा हजार रुपये वार्षिक देण्यात येणार असून दोन हजार रुपयांचा एक हप्ता असणार आहे. अशा तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत. या योजनेसाठी जवळपास चार हजार कोटी रुपयांची तरतूद महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे.

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा हप्ता कधी जमा होणार?

नुकताच शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा चौदावा हप्ता बँक खात्यात जमा झाला आहे. या हप्त्यासोबतच नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता देण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र हे शक्य झाले नाही हा पहिला हप्ता काही तांत्रिक समस्यांमुळे रखडला असून या तांत्रिक समस्या आता लवकर सोडवण्यासाठी महा आयटीच्या माध्यमातून जलद प्रयत्न केले जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांना या योजनेतून देखील पैसे मिळणार आहेत.

या ठिकाणी घेऊ शकता योजनेबाबत सविस्तर माहिती

तुम्हाला नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेबाबत कोणतीही अडचण असेल तर टेन्शन घेऊ नका आम्ही तुमच्यासाठी एक खास अँप बनवले आहे. ज्याचं नाव आहे Hello Krushi या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला या योजनेबाबत सविस्तर माहिती मिळू शकते. त्याचबरोबर फक्त या योजनेसंबंधीच नाही तर शेती संबंधित ज्या काही योजना आहेत त्या सर्व योजनांची माहिती तुम्हाला या ॲपच्या माध्यमातून मिळते. ती ही अगदी मोफत त्यामुळे लगेचच प्ले स्टोअर वर जा आणि आपले Hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा.

error: Content is protected !!