Nano DAP : नॅनो डीएपी खताची अर्थसंकल्पात चर्चा; शेतकऱ्यांना होणार आर्थिक फायदा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच देशाचा अर्थसंकल्प सादर (Nano DAP) केला. यावेळी त्यांनी सर्व कृषी हवामान विभागांमधील विविध पिकांवर नॅनो डीएपी वापर करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता देशात शेतीसाठी नॅनो यूरियानंतर, नॅनो डीएपी या खताच्या वापरावर भर दिला जाणार असल्याचे अधोरेखित होत आहे. आज आपण नॅनो डीएपी (Nano DAP) खत म्हणजे काय? त्याचा कृषी क्षेत्रात कसा फायदा होणार? याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

नॅनो डीएपी खत? (Nano DAP Discussed In Budget)

केंद्र सरकारने याआधीच शेतकऱ्यांसाठी नॅनो युरियाची निर्मिती केली असून, तो गोणीऐवजी 500 मिली बॉटलमध्ये शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे. यासाठी केंद्राकडून 17 कोटी नॅनो युरिया बॉटलची निर्मिती देखील करण्यात आली आहे. अशी माहिती हिवाळी अधिवेशनादरम्यान विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांनी लोकसभेत दिली होती. त्यानंतर आता सरकारकडून डीएपी खताच्या गोणीऐवजी नॅनो डीएपीची (Nano DAP) लिक्विड स्वरूपातील बॉटल उपलब्ध करून दिली जाणार आहे. या नॅनो डीएपी बॉटलचे लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते मागील वर्षीच्या एप्रिल महिन्यात करण्यात आले आहे. अर्थात नॅनो डीएपी (डाय-अमोनियम फॉस्फेट) हे एक प्रकारचे खत असून, ते नॅनोमेट्रिक आकारात म्हणजेच लिक्विड प्रकारात तयार केले जाणार आहे.

शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा

देशात प्रामुख्याने युरिया आणि डीएपी या खताचा वापर सर्वाधिक होतो. युरिया सर्वाधिक तर डीएपी दुसऱ्या क्रमांकाचे सार्वधिक वापरले जाणारे खत आहे. सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना डीएपी हे खत ५० किलोच्या गोणीच्या माध्यमातून उपलब्ध आहे. मात्र सरकारकडून ८ टक्के नायट्रोजन आणि १६ टक्के फॉस्फरस या स्वरूपात हे नॅनो डीएपी खत द्रव स्वरूपात उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेतात एका गोणीऐवजी एका बॉटलची फवारणी पिकांना करावी लागणार आहे. अर्थात एका एकर क्षेत्रासाठी शेतकऱ्यांना केवळ ही ६०० रुपयांची अर्धा लिटरची बॉटल फवारावी लागणार आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना डीएपीची गोणी १३०० ते १५०० रुपयांपर्यत मिळत होती. त्यामुळे आता नॅनो डीएपी खतामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा देखील होणार आहे.

नॅनो डीएपीचे वैशिष्ट्ये

  • गोणीत उपलब्ध होणाऱ्या डीएपी पेक्षा स्वस्त.
  • झाडाची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रभावी.
  • जैविक दृष्ट्या सुरक्षित असून, माती, पाणी आणि वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होते.
  • नॅनो डिएपीच्या वापरामुळे गोणीत उपलब्ध होणाऱ्या डीएपीच्या आयातीवरील अवलंबित्व कमी होणार आहे.
  • याशिवाय कमी प्रमाणामध्ये शक्य तितकाच वापर होणार आहे.
  • वाहतूक आणि साठवणूक खर्चातही बचत होणार आहे.
error: Content is protected !!