Nano Urea : युरिया गोणीऐवजी 500 मिली बॉटल; केंद्राकडून 17 कोटी नॅनो युरिया बॉटल निर्मितीची तयारी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील युरियाच्या वाढत्या वापरामुळे केंद्र सरकारला विदेशातून मोठया प्रमाणात युरियाची आयात (Nano Urea) करावी लागते. गोणी स्वरूपातील युरियामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चातही मोठ्या प्रमाणात वाढ होते. मात्र केंद्र सरकारने विदेशी युरिया आयात पूर्णपणे थांबवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. यासाठी देशात तीन स्वदेशी नॅनो युरिया प्लांट उभारण्यात आले असून, त्या माध्यमातून 17 कोटी नॅनो युरिया (Nano Urea) बॉटलची निर्मिती करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांनी लोकसभेत दिली आहे.

अर्जुन मुंडा यांनी लोकसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले आहे की, नॅनो युरियाच्या उत्पादनासाठी देशात तीन स्वदेशी युरिया प्लांट उभारण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने गुजरातमधील कलोल येथे इफकोकडून, उत्तर प्रदेशातील फूलपुर आणि आंवला येथे हे प्लांट उभारण्यात आले आहे. या तीनही युरिया प्लांटची उत्पादन क्षमता वार्षिक 17 कोटी बॉटल (एक बॉटल 500 मिली) इतकी आहे. याशिवाय गुजरातमधील आनंद येथे नॅनो सायन्स आणि रिसर्च सेंटरच्या माध्यमातून अन्य एका 4.5 कोटी बॉटल वार्षिक उत्पादन क्षमतेच्या प्रकल्पाच्या उभारणीची घोषणा करण्यात आली आहे. अशी माहितीही मुंडा यांनी लोकसभेत लेखी उत्तरात दिली आहे.

आयसीएआरकडून चाचणी यशस्वी (Nano Urea 17 Crore Bottles)

भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या (ICAR) संशोधन केंद्र आणि कृषी महाविद्यालयांच्या माध्यमातून विविध भागांमध्ये धान, गहू, मोहरी, मका, टोमॅटो, कोबी, काकडी, शिमला मिरची कांदा यांसारख्या पिकांवर नॅनो युरियाची चाचणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता फवारणीच्या माध्यमातून या पिकांना सामान्य युरिया ऐवजी नॅनो युरियाचा वापर करणे शक्य होणार आहे. परिणामी विदेशातून होणारी युरिया आयात पूर्णपणे थांबणार असून, शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चातही मोठी बचत होणार आहे. असेही मुंडा यांनी लोकसभेत म्हटलेले आहे. दरम्यान, आर्थिक वर्ष 2022-23 मधील एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांच्या कालावधीत युरियाच्या विक्रीमध्ये ८ टक्क्यांनी वाढ होऊन ती 207.63 लाख टन इतकी नोंदवली गेली आहे. मागील वर्षी याच कालावधीत युरियाची विक्री 192.61 लाख टन इतकी नोंदवली गेली होती.

error: Content is protected !!