Nano Urea : ड्रोन तंत्रज्ञानासह नॅनो युरियामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार; इफकोचा दावा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : 2023 या वर्षांमध्ये देशातील शेतकऱ्यांना नॅनो युरियाचे (Nano Urea) चांगले परिणाम दिसून आले आहे. नॅनो युरियाच्या वापरामुळे देशातील शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होणार असून, सरकारी अनुदानावरील सरकारचा खर्च देखील कमी होणार आहे. यावर्षी कंपनीकडून नॅनो युरियाच्या बॉटलची निर्यात देखील करण्यात आली आहे. असे इंडियन फार्मर्स फर्टिलाइजर को-ऑपरेटीव लिमिटेडचे (इफको) व्यवस्थापकीय संचालक डॉ. यूएस अवस्थी यांनी (Nano Urea) म्हटले आहे.

50 हजारांहून अधिक चाचण्या (Nano Urea Beneficial For Farmers)

याशिवाय सध्या कंपनीने शेतीतील ड्रोन वापर वाढावा यासाठी काम सुरु केले असून, आतापर्यंत देशातील 50 हजारांहून अधिक ठिकाणी कंपनीकडून ड्रोन चाचणी करण्यात आली आहे. इतकेच नाही तर कंपनीकडून ग्रामीण भागातील 600 नवउद्योजकांना ड्रोन वितरण व्यवस्था उभारण्यासाठी सोबत घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे यामध्ये जवळपास 300 महिलांचा समावेश आहे. ज्यांना सरकारच्या योजनेनुसार ड्रोन दीदी म्हणून ओळखले जाणार आहे. त्यामुळे आता ड्रोन तंत्रज्ञान आणि नॅनो युरीयाच्या वापरातून मृदा संरक्षण, पर्यावरण संरक्षणासह शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. असेही अवस्थी यांनी म्हटले आहे.

52 हजार केंद्रांची उभारणी

इफकोकडून उत्तरप्रदेश आणि झारखंड या दोन राज्यांमधील विविध जिल्ह्यांमध्ये नॅनो युरिया (Nano Urea), आणि नॅनो डीएपी खताचे स्टॉल लावून जवळपास 30 हजाराहून अधिक ड्रोन स्प्रे परीक्षण चाचण्या करण्यात आल्या आहे. इतकेच नाही तर देशातील शेतकऱ्यांना ड्रोनबाबत जागरूक करण्यासाठी देशभरात कंपनीकड़ून जवळपास 52000 पंतप्रधान किसान समृद्धी केंद्र उभारण्यात आले आहेत. देशातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची साधने पुरवत, त्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी कंपनीकडून अशाच पद्धतीने पुढेही काम चालू ठेवले जाईल, असेही अवस्थी यांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांसोबतच ड्रोन वापरामुळे देशभरात 5000 हजार नवउद्योजक तयार होणार आहेत. यामध्ये महिलांचा विशेष सहभाग असणार आहे. ज्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असून, ग्रामीण महिला सशक्तीकरणासोबतच शेतीमध्ये देखील आधुनिक क्रांती होणार आहे. असेही डॉ. यूएस अवस्थी यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!