Nari Cow Breed : पशुपालकांनो, ‘या’ जातीची गाय पाळा; देत चांगले दूध, होईल दूधउत्पादनात मोठी वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Nari Cow Breed : आपल्याकडे शेतीला जोडधंदा म्हणून अनेकजण पशुपालन हा व्यवसाय करतात. यामधून अनेक लोक चांगले पैसे देखील कमवत आहेत. गायीच्या दुधापासून अनेकजण वेगेवेगळे पदार्थ बनवतात आणि त्याची विक्री करून चांगला नफा कमवतात. गायीचे तूप उत्तम आहे, पण सिरोही जातीच्या गायीच्या तुपाला बाजारात खूप वेगळी मागणी आहे. चलातर मग जाणून घेऊया सिरोही गायबद्दल सविस्तर माहिती.

सिरोही गाय ही गुजरात राज्यातील मानली जाते. गुरांमध्ये ही सर्वात शुद्ध भारतीय जात आहे. ही जात मुख्यतः गुजरात आणि राजस्थानच्या भागात आढळते. इतर गायींच्या तुलनेत या गायीची दूध उत्पादन क्षमता खूप चांगली आहे. या गायीचे आयुष्य 18 ते 20 वर्षे असते, जे सामान्य गायींच्या तुलनेत 2 ते 3 वर्षे जास्त असते. त्यामुळे या गायीचे पालन करणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल.

दूध उत्पादन

दूध उत्पादन क्षमतेबद्दल बोलायचे झाले तर सिरोही गाय दररोज 10 ते 12 लिटर दूध देते. NDDB नुसार, सिरोही जातीची गाय (Nari Cow Breed) एका बायंटमध्ये 1647 लिटर दूध देऊ शकते. त्यामुळे तुम्ही देखील या गायीचे पालन करून चांगले पैसे कमावू शकता. या गायीच्या तुपाला मोठी मागणी असते त्यामुळे तुम्ही या गायीचे तूप विकून देखील चांगले पैसे कमावू शकता.

Nari Cow Breed गायीची वैशिष्ट्ये काय आहेत?

  • सिरोही गायींचे वजन 250 ते 300 किलो पर्यंत असते, त्या इतर गायींच्या तुलनेत वजनदार असतात. या प्रजातीच्या बैलांचे वजन 350 ते 400 किलो पर्यंत असते.
  • या गायींची सरासरी उंची 120 ते 125 सेमी पर्यंत असते. तर बैलांची उंची 130 ते 135 सेमी पर्यंत असते.
  • ही प्रजाती साहिवाल, राठी, गीर या गायींच्या उत्तम जातींना मागे टाकते. त्याचे तूप बाजारात दुप्पट दराने विकले जाते.
  • या जातीला भौगोलिक आधारावर नाव देण्यात आले आहे. राजस्थानच्या अरवली पर्वताच्या शिखरावर स्थानिक भाषेत याला नार असेही म्हणतात. त्याचा स्वभाव भटकंतीचा असतो.
error: Content is protected !!