Natural Farming : पडीक जमिनीत दोघींनी फुलवली नैसर्गिक शेती; शहरी लोकांना लागला शेतीचा लळा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : विशाखापट्टणममधील आंध्र विद्यापीठाच्या पडीक जमिनीत दोघा मैत्रिणींनी नैसर्गिक शेती (Natural Farming) फुलवली आहे. ज्यामुळे सध्या विद्यापीठातील अवनी ऑरगॅनिक्स गार्डनिंग हब आता एका समृद्ध नैसर्गिक शेतात विकसित झाले आहे. परिणामी, सध्या शहरी लोंकांचे या शेतीकडे पावले वळत असून, त्यातून हळूहळू शहरी रहिवाशांचा एक समुदाय शेतीकडे ओढला जात आहे. ज्यास शेती आणि मातीबद्दल आस्था आहेत, असे लोक या सामुदायिक शेत (कम्युनिटी फार्म) येऊन, शेतीबाबत (Natural Farming) जाणून घेत आहेत.

अशी झाली उपक्रमाची सुरुवात (Natural Farming)

नोव्हेंबर 2023 मध्ये, उषा राजू आणि अवनी ऑरगॅनिक्सच्या हिमा बिंदू यांनी आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. पीव्हीजीडी प्रसाद रेड्डी यांच्याशी संपर्क साधला. डॉ दुर्गाबाई देशमुख महिला अभ्यास केंद्रासमोरील नापीक जमिनीच्या तुकड्यावर सामुदायिक शेतीची संकल्पना (Natural Farming) त्यांनी मांडली. उषा राजू सांगतात, “आम्हाला विद्यापीठातील विद्यार्थ्यांना आणि विशाखापट्टणममधील रहिवाशांना नैसर्गिक शेती तंत्राचे प्रशिक्षण द्यायचे होते, जिथे ते स्वयंसेवा करू शकतील आणि शेती उत्पादनाचे फायदे मिळवू शकतील.”

सुरुवातीला पालेभाज्यांची लागवड

उषा सांगतात, पहिल्या टप्प्यात राजगिरा, पालक, पुदिना, गव्हाचे गवत, मेथी, रताळे, टोमॅटो आणि फुलकोबी यांसारख्या विविध प्रकारच्या पालेभाज्या या क्षेत्रात उगवल्या गेल्या. आमच्या या उपक्रमात लवकरच, विद्यापीठातील विद्यार्थी, मॉर्निंग वॉक करणारे, पालक त्यांच्या मुलांसह स्वयंसेवकांमध्ये सामील झाले. आमच्याकडे विद्यार्थ्यांचा एक छोटा गट आहे, जो फार्मवर इंटर्न म्हणून काम करत आहे आणि त्यांना स्टायपेंड दिला जातो.

रसायनमुक्त नैसर्गिक शेतीवर भर

नैसर्गिक शेतीच्या (Natural Farming) तंत्रावर आधारित, प्रतिबंधात्मक कीड व्यवस्थापन पद्धतीचा सराव येथे केला जातो. “माती पूर्णपणे व्हर्जिन आणि रसायनमुक्त असल्याने कीटकांचे आक्रमण कमी होते. पण काही भाज्यांना कीटक लागण्याची शक्यता असते. कीटकांच्या आक्रमणाच्या प्रमाणात अवलंबून या समस्येचे निराकरण करण्यासाठी आम्ही शेण, गोमूत्र, तंबाखूची पाने, कडुनिंब आणि पोंगमिया यांचे मिश्रण वापरतो. उदाहरणार्थ, वारंवार बुरशीजन्य रोग असलेल्या कडधान्याच्या बाबतीत, आम्ही आंबट ताक वापरतो,” बिंदू सांगतात.

मूळ वाणांची लागवड

इथे वापरल्या जाणाऱ्या बहुतेक बिया म्हणजे मूळ जाती (वाण) आहेत. बिंदू सांगतात की, ते खास वाण निवडतात. अलीकडेच, त्यांनी काकीनाडा येथे आढळणाऱ्या चित्राडा बीराच्या बिया पेरल्या. त्याचप्रमाणे, 10 ओळींची भेंडी आणि पेनडा वांगा या पश्चिम गोदावरीतील वांग्याची विविधता अलीकडेच शेतात आणली गेली आहे. डॉ. दुर्गाबाई देशमुख सेंटर फॉर वुमेन्स स्टडीजच्या समोर असलेल्या आंध्र युनिव्हर्सिटी या अवनी ऑरगॅनिक्स गार्डनिंग हबमध्ये, लोक सकाळी 7 ते सकाळी 9 च्या दरम्यान फिरू शकतात, स्वतः काम करून योगदान देऊ शकतात, त्यांनी स्वतः पिकविलेल्या स्वतः च्या भाज्या काढू शकतात, स्वतःच त्यांचे वजन करू शकतात आणि खरेदी करू शकतात.

error: Content is protected !!