Natural Mango : कसा ओळखायचा केमिकलविरहित आंबा, वाचा…चार पर्याय; नाही होणार फसवणूक!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकरी अगदी प्रामाणिकपणे नैसर्गिकरित्या झाडावर आंबा (Natural Mango) पिकवत असतात. मात्र, एकदा व्यापाऱ्यांच्या हातात आंबा गेल्यानंतर आणि त्यापुढे किरकोळ विक्रेत्यांकडे गेल्यानंतर त्यावर त्यांच्याकडून बऱ्याच केमिकलयुक्त प्रक्रिया केल्या जातात. याशिवाय काही गुणवत्ता नसलेल्या आंब्याला देखील केमिकलने पिकवून, त्याचे मूल्यवर्धन केले जाते. ज्याचा ग्राहक आणि शेतकरी अशा दोघांना (Natural Mango) मोठा फटका बसतो.

मात्र, या सर्वांमध्ये काहीवेळा ग्राहक शेतकऱ्यांना दोष देताना आढळून येतात. सध्या आंबा हंगाम जोरात सुरु आहे. ज्यामुळे अशा केमिकलने पिकवलेल्या आंब्यांमुळे, प्रामाणीकपणे कष्टाने आंबा पिकवलेल्या (Natural Mango) शेतकऱ्यांच्या, आंब्याला मोठा आर्थिक फटका बसतो. अर्थात गुणवत्तापूर्ण आंब्याऐवजी अनेकदा ग्राहक, गुणवत्ताशून्य आंबा खरेदी करतात. ज्यामुळे आज आपण केमिकलविरहित अर्थात नैसर्गिकरित्या पिकलेला आंबा कसा ओळखायचा? याबाबत जाणून घेणार आहोत.

असा ओळखा केमिकलविरहित आंबा? (Natural Mango How To Recognize)

1. ग्राहकांनी शक्य असेल आंबा खरेदी करताना एका पाण्याने बादलीत टाकून पाहावा. आंबा बादलीत टाकल्यानंतर पाण्यात बुडून खाली जात असेल तर असा आंबा हा नैसर्गिकरित्या झाडावर पिकलेला असतो. याउलट तुम्ही खरेदी करत असलेला आंबा हा बादलीत पाण्यावर तरंगताना आढळून आला तर समजून जायचे की संबंधित आंबा हा केमिकलने पिकवण्यात आला आहे.

2. आंब्याच्या रंगावरून देखील आंब्याची ओळख होते. जे आंबे केमिकलने पिकवले जातात ते आंबे पिवळ्या आणि हिरव्या अशा दोन रंगामध्ये आढळून येतात. अर्थात या दोन्ही रंगाचे डाग या आंब्यांवर पाहायला मिळतात. तर याउलट जे आंबे हे नैसर्गिकरित्या (Natural Mango) पिकवलेले असतात. त्यांच्यावर संपूर्ण एकसारखा पिवळा रंग असतो.

3. याशिवाय जेव्हा तुम्ही नैसर्गिकरित्या झाडावर पिकलेल्या आंब्याला मधोमध कापतात. तेव्हा आंब्याचा पूर्ण पल्प आणि सालीचा रंग हा एकसारखा असतो. तर याउलट तुम्ही आंबा मधोमध कापल्यानंतर सालीचा रंग आणि आंब्याच्या पल्पच्या रंगामध्ये फरक आढळून आला. तर असा आंबा हा केमिकलच्या मदतीने पिकवलेला असतो.

4. याशिवाय केमिकलच्या माध्यमातून पिकवलेल्या आंब्याची आणखी एक खूण म्हणजे अशा आंब्यावर पांढरे मोठे डाग असतात. तर याउलट नैसर्गिक पिकलेला आंब्यावर असे पांढरे डाग नसतात. ज्यामुळे पांढरे आणि निळे डाग असलेल्या असलेल्या आंब्याची खरेदी करू नये.

चव कशी असते?

याशिवाय केमिकलच्या माध्यमातून पिकवलेले आंबे हे थोडेसे कडवट लागतात. किंवा मग त्यांची चव ही जळलेल्या पदार्थासारखी असते. नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्याची गोडी तुलनेने खूप अधिक असते. याशिवाय केमिकलयुक्त आंबा खाल्ल्याने पोटाचे विकार होतो. गळ्यात जळजळ होते, पोट दुखते किंवा मग कधीकधी डायरिया देखील होतो. कारण आंबा पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइड आणि इथीलीन पावडरचा वापर केलेला असतो.

error: Content is protected !!