Navinya Purna Yojana : राज्यातील ग्रामीण भागात दुध उत्पादनास चालना देण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण (सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना आणि जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण आदिवासी क्षेत्र उपयोजना) योजनेंतर्गत लाभार्थ्यांना ०२ दुधाळ देशी / ०२ संकरीत गायी / ०२ म्हशींचा एक गट वाटप करण्यात येते. या योजनेच्या लाभार्थी निवड निकषामध्ये दारिद्रय रेषेखालील लाभार्थी व अत्यल्प भूधारक शेतकरी यांचा समावेश करण्याबाबत यासंदर्भात दि. ११ सप्टेंबर २०२३ रोजी शासननिर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
या शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती / जमातीच्या लाभार्थ्यांची निवड खालील प्राधान्यक्रमानुसार करण्यात येणार आहे.
१. दारिद्रय रेषेखालील लाभार्थी
२. अत्यल्प भूधारक शेतकरी (१ हेक्टर पर्यंतचे भूधारक)
३. अल्प भूधारक शेतकरी (१ ते २ हेक्टर पर्यंतचे भूधारक)
४. सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले)
५. महिला बचत गटातील लाभार्थी (अ.क्र. १ ते ४ मधील)
आवश्यक कागदपत्रे
- फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)
सातबारा (अनिवार्य) - ८ अ उतारा (अनिवार्य)
- अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र
- आधारकार्ड (अनिवार्य )
- ७/१२ मध्ये लाभार्थीचे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र, अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
- अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
- रहिवासी प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य )
- दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
- बँक खाते पासबुक सत्यपत्र (असल्यास अनिवार्य)
- रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल.) (असल्यास अनिवार्य)
- दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य )
- बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
- वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
- शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
- रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
- प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत
अधिक माहितीसाठी जवळच्या पशुधन विकास अधिकारी किंवा पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.