New Holland Tractor : न्यू हॉलंडचा नवीन ‘रोबोटिक’ इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च; वाचा.. फीचर्स?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : जगभरात आपल्या अत्याधुनिक ट्रॅक्टर्ससाठी न्यू हॉलंड कंपनी (New Holland Tractor) प्रसिद्ध आहे. कंपनीने अलीकडेच तुर्की येथील एका कृषी मेळाव्यात आपला नवीन ‘रोबोटिक’ ट्रांसमिशनवाला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च केला आहे. ज्यामुळे आता 100 टक्के इलेक्ट्रिक ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेती करणे सोपे होणार आहे. असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कंपनीने नव्याने तयार केलेला ट्रॅक्टर हा कॉम्पॅक्ट साईजमध्ये असून, त्याला पूर्णपणे विजेवर चालवण्यासाठी संचालित करण्यात आले आहे. त्यामुळे आता कंपनीने मागील एक वर्षापेक्षा कमी कालावधीत आपला दुसरा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर (New Holland Tractor) लॉन्च केला आहे.

75 किलोवॅटची बॅटरी क्षमता (New Holland Tractor Robotic Electric Tractor)

न्यू हॉलंड कंपनीने आपल्या या नव्याने विकसित केलेल्या ट्रॅक्टरला 75 किलोवॅटची क्षमतेच्या बॅटरी दिल्या आहे. या बॅटरीला हा शक्तिशाली इलेक्ट्रिक ट्रॅक्टर (New Holland Tractor) चालवण्यासाठी 800 व्होल्टची उच्च क्षमता देण्यात आली आहे. या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरला एक मोटर चाकांद्वारे कार्यान्वित करते. दुसरी मोटर हायड्रोलिक्स आणि पावर टेक-ऑफसह येते. परिणामी या ट्रॅक्टरला 75 किलोवॅटची क्षमतेच्या दोन बॅटरी देण्यात आल्या आहे. ज्यामुळे ट्रॅक्टरद्वारे प्रभावशाली काम करण्यास मदत होते.

‘रोबोटिक’ ट्रांसमिशन

न्यू हॉलंड कंपनीने आपल्या या नव्याने विकसित टी 3 इलेक्ट्रिक ट्रॅक्टरला रोबोटिक ट्रांसमिशन दिले आहे. ज्यामुळे ट्रॅक्टरचा इलेक्ट्रिक स्वरूपात गिअर बदलण्यास मदत होऊन, चालकाला आरामदायी अनुभव प्रदान होतो. या ट्रॅक्टरच्या इलेक्ट्रिक ड्राइवच्या मदतीने कमीत कमी 1 किमी प्रति तास इतका अधिकतम टॉर्क उपलब्ध होतो. याशिवाय तुम्हाला जर अधिक वेगाने काम करायचे असल्यास, त्यासाठी तुम्ही 40 किमी प्रति तास मोडपर्यंत काम करण्याची सुविधा कंपनीने उपलब्ध करून दिली आहे.

टू आणि फोर व्हील ड्राइवसह उपलब्ध

न्यू हॉलंडने कंपनीने आपल्या नवीन ‘रोबोटिक’ इलेक्ट्रिक ट्रॅक्टरला खूप रुबाबदार लुक दिला असून, त्यास टू आणि फोर व्हील ड्राइवसह उपलब्ध करण्यात आले आहे. अर्थात कंपनीने प्रथमतः टू व्हील ड्राइव मॉडल विकसित केले होते. त्यानंतर आता विकल्प म्हणून हा फोर-व्हील ड्राइव ‘रोबोटिक’ इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च केला आहे. न्यू हॉलंडने कंपनीने आपल्या या टी 3 इलेक्ट्रिक ट्रॅक्टरला एका तुर्की कंपनीच्या सहकार्यातून लॉन्च केले आहे.

error: Content is protected !!