New Holland Tractors : 6 वर्ष वॉरंटीसह न्यू हॉलंडचा ‘हा’ आहे 47 एचपी ट्रॅक्टर; वाचा किंमत?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : न्यू हॉलंड कंपनी ही शेतकऱ्यांमध्ये दमदार ट्रॅक्टर्ससाठी (New Holland Tractors) विशेष प्रसिद्ध आहे. कंपनीने शेतकऱ्यांसाठी विविध मॉडेल आणि क्षमतेमध्ये ट्रॅक्टरची निर्मिती केली असून, कंपनीचे सर्वच ट्रॅक्टर कमी इंधनात अधिक काम करतात. त्यामुळे आता तुम्हीही तुमच्या शेतीसाठी एखादा दमदार ट्रॅक्टर घ्यायचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्ही न्यू हॉलंड कंपनीचा ‘न्यू हॉलंड एक्सेल 4710’ हा ट्रॅक्टर खरेदी करून तुमची शेतीची कामे सोपी करू शकतात. याच पार्श्वभूमीवर आज आपण ‘न्यू हॉलंड एक्सेल 4710’ या ट्रॅक्टरबद्दल (New Holland Tractors) सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

‘न्यू हॉलंड एक्सेल 4710’ ट्रॅक्टरबद्दल (New Holland Tractors For Farmers)

न्यू हॉलंड कंपनीचा ‘न्यू हॉलंड एक्सेल 4710’ हा ट्रॅक्टर (New Holland Tractors) 2700 सीसी क्षमतेसह 3 सिलेंडरमध्ये उपलब्ध असून, त्यास वॉटर कुलिंग इंजिन देण्यात आले आहे. हा बलाढ्य ट्रॅक्टर 47 एचपीचा असून, तो 168 एनएम टॉर्क जनरेट करतो. त्याला कंपनीने ड्राय एअर क्लीनर विथ क्लॉगिंग सेन्सर टाइप एयर फिल्टर देण्यात आला आहे. जो इंजिनचे धूळ माती यापासून संरक्षण करतो. कंपनीने आपल्या या ट्रॅक्टर कमीत कमी पीटीओ पॉवर 42.5 एचपी इतकी दिलेली असून, या ट्रॅक्टरचे इंजिन 2100 आरपीएमची निर्मिती करते. याशिवाय कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला 60 लीटर क्षमतेची डिझेल टाकी दिलेली आहे. तसेच ट्रॅक्टरला कंपनीकडून 1800 किलो वजन उचलण्याची क्षमता देण्यात आली असून, त्याचे वजन जवळपास 2010 किलो इतके आहे. कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरची निर्मिती 3515 एमएम लांबी आणि 2080 एमएम रूंदीसह 2045 एमएम व्हीलबेसमध्ये तयार केले आहे.

काय आहेत फीचर्स?

  • न्यू हॉलंड कंपनीने ‘न्यू हॉलंड एक्सेल 4710’ ट्रॅक्टरला (New Holland Tractors) पॉवर स्टीयरिंग दिलेली आहे.
  • पुढील बाजूस 8 आणि मागील बाजूस 2 गिअर / पुढील बाजूस 8 आणि मागील बाजूस 8 गिअरसह गिअरबॉक्स देण्यात आला आहे.
  • डबल क्लच विथ आयपीटीओ लेव्हर टाइप क्लच देण्यात आला असून, तो कॉस्टंट मेश एएफडी साईड शिफ्ट टाइप ट्रांसमिशनसह येतो.
  • कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला ऑइल इमर्जड ब्रेक्स दिलेले असून, ते उतारावर किंवा शेतामध्ये क्षणात नियंत्रण मिळवण्यास मदतगार ठरतात.
  • कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला पुढील बाजूस (8+2) गिअरसाठी 3.0 ते 33.24 किमी प्रति तास इतका वेग तर (8+8) गिअरसाठी 2.93 ते 32.52 किमी प्रति तास इतका वेग दिलेला आहे.
  • याशिवाय कंपनीने आपल्या ट्रॅक्टरला मागील बाजूस (8+2) गिअरसाठी 3.68 ते 10.88 किमी प्रति तास इतका वेग तर (8+8) गिअरसाठी 3.10 ते 34.36 किमी प्रति तास इतका वेग दिलेला आहे.
  • न्यू हॉलंड कंपनीचा ‘न्यू हॉलंड एक्सेल 4710’ हा ट्रॅक्टर 2 व्हील ड्राइवसह येतो.
  • कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला पुढील बाजूस 6.5 x 16 आकारात तर मागील बाजूस 14.9 x 28 आकारात टायर दिलेले आहेत.

किती आहे किंमत?

न्यू हॉलंड कंपनीने आपल्या ‘न्यू हॉलंड एक्सेल 4710’ या ट्रॅक्टरची (New Holland Tractors) किंमत भारतीय शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन, निश्चित केली आहे. कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरची शोरूम किंमत 7.63 लाख ते 9.41 लाख रुपये इतकी ठेवली आहे. जी इतर कंपन्यांच्या ट्रॅक्टरच्या किमतींपेक्षा खूपच कमी आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये आरटीओ रजिस्ट्रेशन आणि रोड टॅक्स यामुळे ऑन रोड किमतीमध्ये वेगवेगळया भागात या ट्रॅक्टरच्या किमतीत तुम्हाला बदल पाहायला मिळू शकतो. कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला 6000 तास किंवा मग 6 वर्ष जे अगोदर संपेल. तितक्या क्षमतेत वॉरंटी प्रदान केलेली आहे.

error: Content is protected !!